Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. ऍलन विजय मोरे व संतोष ममदापूर यांनी त्यांचा सत्कार केला. प्रमोद सावंत यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधला. त्यांची आस्थेने चौकशी केली. वृद्धाश्रमाच्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल आणि शांताईमध्ये झालेल्या या आदरातिथ्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि विजय मोरेंचे कौतुक केले. यावेळी …

Read More »

भारताची जागतिक भूक इंडेक्समध्ये घसरण; पाक, श्रीलंका, बांग्लादेश वरच्या स्थानावर

  जागतिक भूक निर्देशांकात घसरण! नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय चलनाची घसरण बाजारात चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कमी पडझड झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतंच नमूद केलं. मात्र, जागतिक भूक निर्देशांकात मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घरसरण झाल्याचं धक्कादायक …

Read More »

भारतीय महिलांनी जिंकला आशिया चषक

  सिल्हेट : महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. तब्बल आठ गडी राखून श्रीलंकेचा दारूण पराभव केला. 25 चेंडूत 50 धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. रेणुका सिंगने 3 षटकात 3 गडी बाद केले तिला …

Read More »

हत्तरगुंजीची चिमुकली भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी

  खानापूर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूर तालुक्यातील चिमुकलीचाही सहभाग लक्षवेधी ठरला. काल भारत जोडो यात्रेत खानापूरमधून हजारो कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये हत्तरगुंजी येथील सविता व गुंडू मयेकर यांची कन्या कु. तेजस्विनी गुंडू मयेकर ही देखील खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासोबत सहभागी झाली होती. कालच्या भारत …

Read More »

रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे : माजी आम. मनोहर किणेकर

  बेळगाव : बेळगाव तालुक्यात रिंगरोडसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी वृत्तपत्रात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. हा रिंगरोड तालुक्यातील शेतकर्‍यांना अधोगतीला नेणारा आहे. येथील शेतकर्‍यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीवरच येथील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह चालत आहे. शेतीचा जोडधंदा दुग्धव्यवसायही अवलंबून आहे. यासाठी शेतकर्‍यांनी हा रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे आहे. तेव्हा …

Read More »

जीआयटीचा दीक्षांत समारंभ संपन्न; 1124 पदवीधरांना पदवी प्रदान

  बेळगाव : बेळगाव येथील प्रतिष्ठित कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे तांत्रिक संस्थेचा (जीआयटी) 6 वा पदवीदान समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी एकूण 1124 पदवीधरांना पदवी देऊन गौरविण्यात आले. कर्नाटक लॉ सोसायटीच्या उद्यमबाग, बेळगाव येथील जीआयटी संस्थेच्या ‘ज्ञानगंगा’ प्रांगणात आज संस्थेचा 6 वा पदवीदान समारंभ पार पडला. केएलएसच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात …

Read More »

तालुक्यातील अतिक्रमित जमिनधारक शेतकर्‍यांना सोमवारी मार्गदर्शन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास 5000 एकर जमिनीपैकी रेव्हनूपड जमिनी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड, एचएल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकर्‍यांना लाभ व्हावा. यासाठी तालुक्यात सरकारी भू अतिक्रमित शेतकरी संघटनेची 2004 साली स्थापना होऊन शेतकरी वर्गाच्या बाजुने सरकारी दरबारी लढा चालू आहे. …

Read More »

गोवा मुख्यमंत्र्यांचे भाजप नेते किरण जाधव यांच्याकडून स्वागत

बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत हे आज डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनी आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी बेळगाव येथे आले असता त्यांनी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपिलेश्वर मंदिराला सदिच्छा भेट दिली व पूजा केली. यावेळी भाजपचे नेते किरण जाधव व मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले.

Read More »

सणासुदीच्या काळात अमूल दूध महागले!

  नवी दिल्ली : सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. अमूलने पुन्हा एकदा दूधाचे दर वाढवले आहेत. अमूलने दिल्लीमध्ये दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे फुल क्रीम दुधाचे दर 61 रुपयांवरुन वाढून 63 रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. त्यामुळे आधीच महागाईची झळ …

Read More »

शिंदे गटाच्या ’ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध

  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढाल-तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आला आहे सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याकारणानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते नाकारलं याप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे, …

Read More »