खानापूर : खानापूर मराठामंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री. परशुराम अण्णा गुरव हे होते तर तर क्रीडा. साकेसह संस्कृती विभागाचे उद्घाटन मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी केले प्रमुख वक्ते म्हणून श्री नागराज यादव एम एल सी विधानपरिषद तथा काँग्रेस प्रवक्ते बेंगलोर हे उपस्थित होते.
मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयमध्ये कला विभागामधून सहा विद्यार्थिनी मध्ये पहिला क्रमांक आरती नाईक 87.79, दुसऱ्या क्रमांक रुकसार धामणेकर 85.88, तिसऱ्या क्रमांका मंदिरा झुंजवाडकर 84.63, चौथा क्रमांक धनश्री धामणेकर 83.17, पाचवा क्रमांक शामल देसाई 82.63, सहावा क्रमांक ईश्वरी मयेकर 81.75 या विद्यार्थिनींचा महाविद्यालय मध्ये त्यांचा गौरवण्यात करण्यात आला.
कार्यक्रमाचे अवचित साधून मान्यवरांच्या हस्ते अनेक आजी-माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जे. के. बागेवाडी यांनी स्वागत व प्रास्ताविकांनी केले ईशस्तवन व स्वागतगीत महाविद्यालयाची जनरल सेक्रेटरी कुमारी माहेश्वरी नांदुरकर हिने सादर केले. मान्यवरांचा परिचय कार्यक्रमाच्या संयोजकता प्राध्यापक जे. बी. हंची त्यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक व्हि. एम. तीरलापूर व प्रा .पांडुरंग भातकांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता क्रीडा शिक्षक प्राध्यापक कपिल गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावर्षीचे क्रीडा व संस्कृती विभागाचे उपाध्यक्ष प्राध्यापक वाय. एस. धबाले सर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गमोठ्या संख्येने उपस्थित होते.