बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांना माहिती नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी बंदी नाही, पण त्यावेळी परिस्थितीचा फायदा घेऊन सीमाभागात गडबड करण्याचा काहींचा डाव असल्याची माहिती आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना रोखलं अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. …
Read More »सीमावादावर चर्चा करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती; अमित शाह यांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी …
Read More »बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू
पाटणा : बिहारच्या सारण जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. छपरा येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. …
Read More »दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने बुधवारी दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मॅरेथॉनमधील विजयी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर उपस्थित होते. तर व्यासपीठावर उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक …
Read More »श्रीगणेश दूध संकलन केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
बेळगाव : नववर्षा निमित्त श्री गणेश दूध संकलन केंद्र उचगाव यांच्या वतीने सर्व दूध उत्पादक शेतकरी बंधू-भगिनींना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दूध केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. सध्या लम्पि सारख्या भयानक रोगाने थैमान घातले आहे. या चर्मरोगाने बाधित जनावरांना कोणताही विमा नसताना जे दूध …
Read More »खानापूर शहराच्या गटारीचे दुषित पाणी मलप्रभेत, ग्रामपंचायत संघटनेने घेतली दखल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदी घाटावरील ड्रेनेज पाईप फुटून नदीच्या पाण्यात मिसळत आहे. याचा परिणाम शहरावासीयाच्या आरोग्याला तसेच मलप्रभा नदीवर येणाऱ्या भाविकांना स्नान केल्याने त्रास होत आहे. या शिवाय गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदीत मिसळत असल्याने कुप्पटगिरी, जळगे, करंबळ, पारिश्वाडसह बैलहोंगल तालुक्यातील गावाना या …
Read More »नवहिंद दिनदर्शिका प्रकाशन समारंभ संपन्न
बेळगाव : सर्वसामान्य जनतेला वेळेत पत पुरवठा करुन त्याचे जीवनमान उचवणारी सहकारात वेगळे स्थान निर्माण करणारी संस्था म्हणजे नवहिंद सोसायटी, असे गौरवोदगार नवहिंद को ऑप. क्रेडिट सोसायटी लि, येळ्ळूर आतरराज्य या संस्थेतर्फे सन 2023 सालासाठी मुद्रित केलेली दिनदर्शिका प्रकाशन करताना दि. बेळगाव पायोनियर अर्बन को ऑप. बॅंकेचे चेअरमन मा. …
Read More »सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडीला बसत आहेत; संजय राऊत
मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही भाजपचे सरकार आहे, त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मधस्थी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत असून अमित शहांच्या उपस्थितीत बैठक …
Read More »खानापूर म. ए. समिती तात्पुरती स्थगित, बरखास्त नव्हे!
खानापूर : 2018 पासून खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन गट कार्यरत होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, ऍड. एम. जी पाटील यांच्या उपस्थितीत विखुरलेल्या दोन्ही गटात 9 नोव्हेंबर रोजी खानापूर समितीत एकी घडवून आणली होती. त्यावेळी खानापूर म. ए. समिती …
Read More »रोहित पवार यांनी घेतली वडगाव येथील समिती कार्यकर्त्यांची भेट
बेळगाव : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागात प्रवेशबंदी केली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार हे गनिमी कावा करत बेळगावात काल मंगळवारी सकाळी दाखल झाले. येळ्ळूर येथील भेटीदरम्यान त्यांनी वडगाव येथील समिती कार्यकर्त्यांची भेट घेतली व संवाद साधला व येथील मराठी जनतेच्या भावना समजून घेतल्या. यावेळी समिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta