Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव महापालिकेत मराठी परिपत्रकावरून गोंधळ; संग्राम कुपेकर यांचा ठाम सवाल

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या सभेत आज मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद झाला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी महापालिकेची परिपत्रके मराठीत द्यावीत, अशी जोरदार मागणी केली. या मागणीवरून सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी महाराष्ट्र भाजपचे नेते संग्राम कुपेकर यांनी ठाम भूमिका घेत, स्पष्ट शब्दांत विचारले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व …

Read More »

संत मीरा बेळगांव, आरव्हीके बंगळूर, विवेकानंद कॉलेज मंगळूर यांना विजेतेपद

  बेळगाव : गणेशपुर रोड येथील गुडशेफर्ड शाळेच्या आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय आंतरशालेय मुला मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा बेळगांव, आरव्हीके, बंगळूर , विवेकानंद पदवीपूर्व कॉलेज मंगळूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 14 वर्षाखालील मुलांच्या …

Read More »

निपाणी तालुका म. ए. समिती, निपाणी विभाग युवा समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

  निपाणी : निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व मराठी भाषिकाना कळविण्यात येते की, अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मतिवडे ता. निपाणी हिंदुराव मोरे यांच्या घरी रविवार दिनांक 27/07/2025 सायंकाळी 6.30 वाजता बैठक आयोजित केली असून, सर्वांनी उपस्थित राहून पुढील अजेंडा …

Read More »

कन्नडसक्ती थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यासह सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या कन्नडसक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. भाषिक अल्पसंख्याकांना कायद्याने दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच त्यांना मिळणाऱ्या सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना …

Read More »

राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

  झालावाड : राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावातील एका सरकारी शाळेत ही धक्कादायक घटना घडली. शाळेमध्ये सकाळी प्रार्थना सुरू असताना अचानक छत कोसळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे छत कोसळून ७ …

Read More »

शहापूर विभाग सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक 27 जुलै रोजी

  बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवन, नवी गल्ली, शहापूर या ठिकाणी बोलाविण्यात आली आहे. तरी शहापूर विभागील शहापूर, होसूर, खासबाग, भारत नगर, वडगांव, जुने बेळगांव, आदी …

Read More »

बंगळूर चेंगराचेंगरी प्रकरण : राज्य मंत्रिमंडळाने न्यायमूर्ती डी’कुन्हा अहवाल स्वीकारला

  बंगळूर.: राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी न्यायमूर्ती जॉन मायकल डी’कुन्हा यांचा अहवाल स्वीकारला. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. कर्नाटकचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले की, आरसीबी विजयोत्सव साजरा करण्यात सहभागी …

Read More »

रेणुकास्वामी हत्याकांड : अभिनेता दर्शनच्या जामीनावरील निर्णय ‘सर्वोच्च’ने ठेवला राखून

  एका आठवड्यात लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश बंगळूर : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या आणि उच्च न्यायालयाने जामिनावर सोडलेल्या स्टार दर्शन आणि पवित्रा गौडा यांच्यासह सात आरोपींच्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला. कर्नाटक सरकारने दर्शनसह सात आरोपींचा जामीन रद्द करण्याची विनंती …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक २७ रोजी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक रविवार दिनांक २७ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र …

Read More »

कुसमळी पुलाजवळ ट्रक अडकला; वाहतुकीवर परिणाम!

  बेळगाव : बेळगाव – जांबोटी – गोवा महामार्गावरील कुसमळी पुलाजवळ रस्त्यावरील चिखलात एक ट्रक अडकला, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. मिळालेल्या माहितीनुसार कुसमळी पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे आणि बरेच काम प्रलंबित आहे. या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. तथापि, गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या …

Read More »