Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा मंगळवारी

सौंदलगा : कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा रंगपंचमी दिवशी मंगळवारी (ता.२२) भरत असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा सोमवार (ता.२१) पासून सुरू होणार असून यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार …

Read More »

बेळगावकर शिवप्रेमीनो.. भुईकोट किल्ला वाचूवया!!

बेळगाव : बेळगाव हे ऐतिहासिक शहर आहे. अनेक राजवटी बेळगावकरांनी पाहिल्या, छत्रपती शिवाजी महाराज तर बेळगावचा मानबिंदू वअस्मितेचे ठिकाण. छत्रपतींच्या नावाने अवघा बेळगावकर फुलून येतो. जय भवानी.. जय शिवाजी ही घोषणा बेळगावकरांसाठी मूलमंत्र आहे. महाराष्ट्रात पसरलेले किल्ले ही शिवाजी महाराजांची रियासत. यांचं जतन करणं शिवप्रेमीचं कर्तव्य आहे. बेळगावचा किल्ला हाही …

Read More »

राज्यस्तरीय पुरस्काराने नगरसेवक शौकत मणेर सन्मानित

निपाणी (वार्ता) : दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब यांच्यावतीने येथील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता शौकत मणेर यांना पुरस्कार घोषित करण्यात आला होता. रविवारी नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शौकात मणेर यांनी पर्यावरण व जैविक विविधता संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत सदर पुरस्कार देऊन त्यांना …

Read More »

रक्तदानाची समाजाला गरज!

निकु पाटील : दौलतराव पाटील फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर निपाणी (वार्ता) : कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत होता. मात्र सध्या हा संसर्ग कमी झाला असला तरीही अनेक रक्तदाते भीतीपोटी रक्तदानासाठी तयार नाहीत त्यामुळे अलीकडच्या काळात सर्वच रक्तपेढीमध्ये रक्कमेचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन दौलतराव पाटील …

Read More »

बेळगावातील सरकारी एपीएमसी वाचविणार : एपीएमसी राज्य संचालक योगेश

बेळगाव : बेळगावातील सरकारी एपीएमसी वाचविण्यासाठी मी बेंगळूरहून आलो आहे. 45 दिवसांपासून शेतकरी–व्यापारी येथे आंदोलन करत आहेत. काय–काय झालेय याची पाहणी करण्यासाठी आलोय. पाहणी केल्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. नंतर बेंगळूरला मुख्य कार्यालयात जाऊन योग्य निर्णय घेणार आहे, असे आश्वासन एपीएमसी खात्याचे राज्य संचालक ए. एम. योगेश यांनी दिले. बेळगावातील …

Read More »

मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाचा मृत्यू

बेळगाव : मॉर्निंग वॉकिंग करणाऱ्या इसमाला पाठीमागून अनियंत्रित मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत रस्त्याशेजारी झाड देखील उखडून पडल्याची घटना घडली आहे. जुना पी. बी. रोड अर्थात बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथे बळळारी नाल्याजवळ रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात झाला असून यात …

Read More »

‘काश्मीर फाईल्स’च्या वादात संजय राऊतांची उडी; काढली ‘बेळगाव फाईल्स’

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक नवं ट्विट केलं आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सध्या वाद सुरु आहे. या चित्रपटावरून दोन वेगवेगळे गट पडले असून, अनेकांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर टीका केली आहे. तर अनेकांनी या चित्रपटाचं जोरदार कौतूक केलं आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा कार्यक्रम

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बेळगाव ग्रामीणच्या आमदार श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर, श्री. आर. एम. चौगुले, गणपत पाटील, …

Read More »

बोरगावमध्ये वळीवाचा अनेक कुटुंबाना फटका!

घरांचे मोठे नुकसान : उत्तम पाटील यांच्याकडून तातडीने मदतीचा हात निपाणी : शनिवारी (ता. १९) बोरगाव आणि परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरावरील छत उडून गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले तर काही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती …

Read More »

संकेश्वरात कडेलोट-कडेकोट नाटकाला उदंड प्रतिसाद

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर रुक्मिणी गार्डन येथे टायनी टेल्स निर्मित कडेलोट..कडेकोट नाटक सादर करण्यात आले. त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचा सत्कार डॉ. मंदार हावळ यांनी केला. उपस्थितांचे स्वागत डॉ. स्मृती हावळ यांनी केले. इटालियन फ्रॅका रामे या लेखिकेने ७० च्या दशकात लिहिलेले हे नाटक अमोल …

Read More »