Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

कन्नड अधिकृत भाषा विधेयक विधानसभेत सादर

उल्लंघन करणाऱ्यांना दंडाची तरतूद; उच्च शिक्षणात आरक्षण, स्थानिकांना नोकरी बंगळूर : राज्य सरकारने गुरुवारी विधानसभेत कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास विधेयक मांडले, ज्यात कन्नडला सर्व स्तरांवर अधिकृत भाषा म्हणून लागू करण्यासाठी आवश्यक विधायक शक्तीचा समावेश आहे. कन्नड आणि संस्कृती, ऊर्जा मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी हे विधेयक सादर केले असून या …

Read More »

संगमला सहकार्य हवे : राजेंद्र पाटील

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हिडकल डॅम येथील श्री संगम सहकारी साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी सभासदांचे सहकार्य हवे असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. ते संगम साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या प्रतिमेचे …

Read More »

संकेश्वर पालिकेच्यावतीने कार्यवाहीचा बडगा..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि संसुध्दी गल्लीत रस्त्या शेजारी बसून भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापारींना आणि केळी, सफरचंदचे गाडे, भेळ गाडा हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम करुन दाखविले आहे. त्यामुळे आज बाजारात वाहतुकीची कोंडी थांबलेली दिसली. कालच्या पालिका सभेत कमतनूर वेस …

Read More »

बिजगर्णी येथे घर फोडून 54 हजार लंपास

  बेळगाव : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 54 हजारांची रोख रक्कम लंपास केली. बिजगर्णी (ता. बेळगाव) येथील कलाप्पा भास्कळ यांच्या घरी गुरुवारी ही घटना घडली. भर दुपारी झालेल्या धाडसी घरफोडीमुळे एकच खळबळ माजली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कल्लाप्पा भास्कळ पत्नी, मुलासमवेत नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून शेतात गेले …

Read More »

पीएफआय कार्यकर्त्यांचा महामार्गावर रास्तारोको

  बेळगाव : देशातील पीएफआय आणि एसडीपीआय संघटनांवरील आयटी आणि ईडीने धाड टाकल्याच्या विरोधात बेंगळुरू-पुणे रास्ता रोको करून आंदोलन करणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांना बेळगावच्या काकती पोलिसांनी अटक केली. पीएफआय कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. यावेळी आरएसएसच्या निषेधार्थ मुर्दा बादचा नारा देत केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. महामार्गावर किलोमीटर अंतरापर्यंत …

Read More »

खानापूरकरांनी अनुभवला रिंगण सोहळा!

  खानापूर (तानाजी गोरल) : रवळनाथ मंदिर खानापूर येथे सालाबाद प्रमाणे संत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. शनिवारी दि. 17 पासून संत ज्ञानेश्वर चालू आहे. या सात दिवसांमध्ये विविध धार्मिक आणि पंढरपूर येथून नामवंत कीर्तनकार व प्रवचन सांगणारे वारकरी महाराज आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज खानापूर शहरातून …

Read More »

युवा नेते उत्तम पाटील यांचा शनिवारी सत्कार सोहळा

नगरसेवक विलास गाडीवड्डर : शिवप्रताप प्रदर्शनापूर्वीचा थरार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उत्तम पाटील व युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती इतर काळात सर्वसामान्यांना मदतीचा हा दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे येथील …

Read More »

खानापूरातील वाढत्या चोऱ्या थांबविण्यासाठी डीवायएसपींकडून जनजागृती

खानापूर : गेल्या पंधरा दिवसापासून खानापूर तालुक्यातील विविध भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गावाबाहेरील लोकवस्ती कमी असलेली घरे चोरट्यांनी लक्ष केली असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस खात्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात स्वतः डीवायएसपी शिवानंद कटगी खेडोखेडी जाऊन जनजागृती करीत आहेत. घरामध्ये किमती वस्तू, दागिने …

Read More »

इदलहोंड-गर्लगुंजी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी; बांधकाम खात्याला निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या इदलहोंड गर्लगुंजी या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पावसाळ्यात रस्त्यावर चरी पडून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील इदलहोंड, गर्लगुंजी, निडगल, सिंगीनकोप, अंकले, तोपिनकट्टी, निट्टूर आदी गावच्या प्रवाशांना तसेच वाहन चालकाना प्रवास करणे कठीण होत आहे. तेव्हा रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अशा मागणीचे …

Read More »

सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली मुस्लीम नेत्यांची भेट!

  नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मशिदीला भेट देत मुस्लीम नेत्यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली. या भेटीबाबत बोलताना उमर इलयासी …

Read More »