सदलगा : येथील सदरगा- एकसंबा रस्त्यावर बाबासाहेब होगार यांच्या घरासमोर रस्त्यालगतच पुरसभेच्या अखत्यारीत येत असलेले हेस्कॉमचे पथदीपचे कंट्रोल डीपी बॉक्स उघड्याच अवस्थेत दिसून येत आहेत. तिथे आतमध्ये फ्यूज आदी सर्वकाही उघड्यावर आणि जमिनीपासून केवळ एक दीड फूट उंचीवर आहे. लहान मुलांच्या अल्लड चाळ्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. नुकतेच दोन …
Read More »दूधगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ
नदी काठावरील पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता; शेतकरी संकटात महापुराची धास्ती.….. सदलगा : काळम्मावाडी व राधानगरी पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार वृष्टी झाल्याने तसेच सदलगा निपाणी परिसरात काल पासून अविश्रांत पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दूधगंगा नदीचे रविवार सकाळपासून पाण्याची पातळी पाच फूटाने वाढल्याने पाणी पात्रा बाहेर पडले आहे. …
Read More »अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या वर्धापन दिनाचे छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते उद्घाटन
पटना : बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे उद्घाटन युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते झाले. कुर्मी क्षत्रिय समाजाचे नेते व डॉ. बाबासाहेब आंबेकरांचे सहकारी त्यागमुर्ती आर. एल. चंदापुरी यांनी बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी 75 वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन केली होती. त्यांचे यथोचित स्मारक पटना येथे उभारले …
Read More »नेरसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ पाटील यांचा सन्मान
खानापूर (प्रतिनिधी) : नेरसेवाडी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ पाटील यांना यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नेरसेवाडी गावच्या ग्रामस्थाच्यावतीने तसेच शाळा सुधारणा कमिटीच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गोपाळ पाटील यांचा सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नजिलकोडल पंच कमिटीचे अध्यक्ष सुरेश …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच
राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असल्याने अगोदरच भरलेल्या धरणांमधून विसर्ग सुरु झाला आहे. गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. उघडलेल्या तीन स्वयंचलित दरवाज्यातून 4 हजार 284 क्युसेकने, तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. …
Read More »हुलीकट्टी येथे भिंत कोसळून महिला ठार
बेळगाव : मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली. हुलीकट्टी गावातील गंगव्वा रामण्णा मुलीमनी यांचा जोरदार पावसामुळे घर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. आज, रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली. यावेळी घरात झोपलेल्या गंगव्वा गंभीर जखमी झाल्या. …
Read More »इंदुरीकर महाराजांची कीर्तनातून चौफेर फटकेबाजी
भाविकांचे प्रबोधनात्मक मनोरंजन हंचिनाळ : या जगात प्रत्येक व्यक्तीत देव आहे याचे त्याला जाणीव नाही आणि याचे ज्ञान आले तर प्रत्येक व्यक्तीला देव होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने अध्यात्माकडे वळलं पाहिजे तरच मनुष्याच्या जीवनाचे सार्थक आहे. आई वडील संत व सद्गुरु ही आपली खरी माणस आहेत. पैसा, …
Read More »शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन
नवी दिल्ली : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन झाले आहे. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देश-विदेशात भक्त आहेत. मध्य प्रदेशमधील महाकौशल झोनमधील …
Read More »लोकोळी मराठी शाळेच्या खोल्या कोसळल्या
खानापूर (प्रतिनिधी) : लोकोळी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेची कौलारू इमारत मुसळधार पावसाने दोन खोल्या जमीनदोस्त झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा सुतार व सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील यांनी शाळेची इमारत कोसळल्याची माहिती संबंधित शिक्षण खात्याला …
Read More »गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणाची हत्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुगळीहाळ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला आहे. अर्जुन गौड (21) असे चाकूने वार केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात हाणामारी झाली, यादरम्यान एका व्यक्तीने अर्जुन गौड याच्या छातीत वार करण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta