Monday , September 21 2026
Breaking News

निट्टूरात खुल्या भजनी स्पर्धा संपन्न

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूरात (ता. खानापूर) येथे खास दीपावलीच्या निमित्ताने वारकरी भजनी मंडळ, पंच मंडळी व ग्रामस्थ यांच्या सौजन्याने रविवारी दि. 23 रोजी सायंकाळी खुल्या संगीत भजनी स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर को-ऑप. बँकेचे संचालक ह. भ. प. श्री. अशोक नार्वेकर हे होते.
संगीत भजनी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
दिपप्रज्वलन निट्टूर ग्रा. पं. चे अध्यक्ष नानू गो नार्वेकर, ह.भ. प. नामदेव क. सुळेभावीकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद सु. कोचेरी, भाजपा खानापूर तालुकाध्यक्ष संजय ज. कुबल, सुरेश ना. देसाई, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल सो. हलगेकर, भाजपा युवा नेते पंडित प्र. ओगले यांच्या हस्ते करण्यात आले. या संगीत भजनी स्पर्धेमध्ये खानापूर, बेळगांव व चंदगड तालुक्यासह अनेक गावांतील भजनी मंडळांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धा कार्यक्रमाला निट्टूर गावातील व पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे संत मंडळी प्रतिष्ठित नागरिक व महिलावर्ग, युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *