Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळवट्टी गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदन

बेळगाव : बेळवट्टी गावाचा वीज पुरवठा दररोज खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे येथील गावातील अनेक कामे करण्यास व्यत्यय येत आहे, त्यामुळे या समस्येला कंटाळून आज बेळवट्टी गावच्या ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालयाला भेट देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा याबाबत निवेदन दिले. बेळवट्टी गावांमध्ये वीज पुरवठा सातत्याने …

Read More »

संकेश्वरात फळांचा राजा आंबा दाखल

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याची जेमतेम आवक सुरु असून आंब्याचा प्रति डझन दर २ हजार रुपये आहे. हंगामाच्या प्रारंभीचा देवगड हापूस आंबा गोड रसाळ असला तरी तो केवळ धनीकांचा बनलेला दिसत आहे. आंब्याचा प्रति डझन दोन हजार रुपये दर सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या …

Read More »

चोरी करण्यासाठी आले अन् स्वतःची गाडी सोडून गेले!

निपाणी चोरट्यांचा प्रताप : विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे टाळला अनर्थ निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. गुरुवारी (ता.१७) पहाटे तीन ते चार या वेळेत प्रगतीनगरमध्ये दोन ठिकाणी सराईत चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. दरम्यान  विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांना वेळीच पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी घटनास्थळीच …

Read More »

वकिलांना मारहाण केल्यामुळे; कामकाजावर बहिष्कार

बेळगाव : पोलिसांनी वकिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची घटना आज गुरुवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारी रात्री कॅम्प येथील आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. हे भांडण तेथे उपस्थित असलेल्या कांही वकिलांनी सोडवून मारामारी …

Read More »

अप्पू यांना लवकरच ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार देणार : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुरू : दिवंगत पुनीत राजकुमार आम्हाला सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांना ‘कर्नाटक रत्न‘ पुरस्कार देण्याबाबत लवकरच बैठक घेऊन तारीख जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आपले सर्वांचे लाडके अप्पू मेगास्टार पुनीत राजकुमार यांचा आज 47वा जन्मदिन आहे. ते …

Read More »

कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे

माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत डिजिटल मतदार नोंदणी कार्यक्रम निपाणी(वार्ता) : राज्यात निवडणूकांचे वारे वाहू लागले असून भाजपा सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे. जनहिताच्या विरोधात सुरू असलेल्या कामकाजामुळे विद्यमान भाजपा सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना अखेर गुजरात राज्याबरोबरच कर्नाटकातही निवडणूका लागण्याची शक्यत आहे. पक्षाच्या सर्व …

Read More »

हॉटेल फेअरफिल्ड मॅरियटमध्ये चोरी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बेळगाव : शहराच्या बाहेरील काकती येथे असलेल्या मॅरियट येथील प्रतिष्ठित स्टार हॉटेल फेअरफिल्डचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांवर सुरक्षेशी तडजोड करणे आणि पाहुणे नसताना हॉटेल रूमचा गैरवापर केल्याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुमारे 9 ते 10 लाख रुपये किमतीच्या हिऱ्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक काकती पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात …

Read More »

हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

बेळगाव : शिक्षणामुळेच आपल्याला खरी ओळख मिळते त्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेणे गरजेचे असून दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवते. त्यामुळे परीक्षेला चांगल्या प्रकारे सामोरे जा, असे प्रतिपादन मेरडा येथील मराठी शाळेतील सह शिक्षक एल. आय. देसाई यांनी केले. हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ …

Read More »

मालतीबाई साळुंखे हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

बेळगाव : मालतीबाई साळुंखे हायस्कूल टिळकवाडीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एन. मन्नोळकर सर होते. प्रमुख अतिथी माधुरी जाधव फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. माधुरी जाधव, सौ. स्मिता शिंदे, शुभम दळवी, श्री. मंगेश देवलापूरकर, समाजसेवक श्री. शांताराम कडोलकर व सर्व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर …

Read More »

हिजाब संदर्भात उद्या मुस्लीम संघटनांकडून ‘कर्नाटक बंद’ची हाक

बेंगळुरू : हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत खेद व्यक्त करण्यासाठी राज्यातील विविध मुस्लिम धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी उद्या गुरुवार दि. 17 मार्च रोजी ‘कर्नाटक बंद’ पुकारला आहे. बेळगावच्या अंजुमन इस्लाम आणि उलेमांनी सर्व मुस्लिम बांधवांना उद्या त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकातील मुस्लिम संघटनांनी संयुक्तरीत्या …

Read More »