Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

प्रभाग १३ ची निवडणूक नको समझोता हवा…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. उद्या गुरुवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. येथील दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या दुःखद घटनेचा विचार करता भाजपाचे नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, …

Read More »

‘कवयित्री’ ममतादीदींना ‘साहित्‍य’ पुरस्‍कार!, प. बंगालमधील साहित्‍यिक भडकले

कोलकाता : पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना पश्‍चिम बांगला अकादमीने उत्‍कृष्‍ट साहित्‍यासाठी पुरस्‍कार जाहीर केला. सरकारी कार्यक्रमात त्‍यांना हा पुरस्‍कार प्रदानही करण्‍यात आला. मात्र आता सरकारच्‍या या कृतीविरोधात अनेक साहित्‍यिक निषेध नोंदवत आहेत. या निषेधार्थ लेखक रत्‍न राशिद बंदोपाध्‍याय यांनी २०१९ मध्‍ये मिळालेला पुरस्‍कार परत केला आहे. तर साहित्‍य …

Read More »

आता रेल्वे प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक!

नवी दिल्ली : दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या रोडावली असली तरी, देशात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. काही राज्यांमध्ये अद्यापही स्थिती चिंताजनक आहे. अशात रेल्वे विभागाने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालने बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे मंडळाचे कार्यकारी …

Read More »

गर्लगुंजी माऊली यात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली देवीच्या यात्रोत्सवाला बुधवारी दि. ११ रोजी झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. मंगळवारी दि. १० रोजी सायंकाळी माऊली देवीची पालखी माऊली मंदिराकडे प्रयाण झाली. त्यानंतर माऊलीदेवीची विधीवत पुजा होऊन गाऱ्हाणा घालुन यात्रेला सुरूवात झाली. बुधवारी दि. …

Read More »

शरद पवार – समिती नेत्यांच्यात सीमाप्रश्नासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा

बेळगाव : बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा केली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी बेळगावातील मराठा बँकेच्या अमृत महोत्सव समारंभात भाग घेतल्यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात भाग घेतला. याच दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसमवेत शरद पवार यांनी बैठक …

Read More »

स्वाभिमानाने जगले पाहिजे : खासदार शरद पवार

बेळगाव : ब्रिटिशांच्या विरोधात वीरराणी कित्तूर चन्नम्मा या स्वाभिमानाने लढल्या. त्यांच्या स्वाभिमानामुळेच आज देशाला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येकाने लाचारी न स्वीकारता स्वाभिमानाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. अंकली (तालुका चिकोडी) येथे काल मंगळवारी वीरराणी कित्तूर चन्नम्मा पुतळ्याचे अनावरण, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या मद्यार्क निर्मिती …

Read More »

सिंहगर्जना युवक मंडळाचा “गुरुवंदना“ कार्यक्रमास पाठिंबा

बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजातर्फे येत्या रविवारी 15 मे रोजी आयोजित सकल मराठा समाजाचे प. पू. श्री मंजुनाथ स्वामी यांच्या गुरुवंदना सोहळ्यास कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळाने आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. सकल मराठा समाज बेळगावतर्फे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री मंजुनाथ स्वामी …

Read More »

खासदार शरद पवार यांचे बेळगावात जल्लोषात स्वागत!

बेळगाव : माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरदचंद्रजी पवार यांचे बेळगावात आज जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भव्य आकाराचा पुष्पहार घालून, फटाक्यांच्या आतषबाजीत पवार यांचे स्वागत केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विविध कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी बेळगावात आज, बुधवारी आगमन झाले. यावेळी शहरातील चन्नम्मा चौकात …

Read More »

खाकी वर्दीतील दिलीप जाधव यांच्या माणुसकीचे मनोज्ञ दर्शन

महाड : पोलिस वा ‘खाकी वर्दी’ म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्या समोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकार्‍याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले तरी वर्दीतही अगोदर …

Read More »

सामाजिक कार्याचा आदर्श विजय मोरे : आमदार राजेश पाटील

बेळगाव : बेळगावचे माजी महापौर विजय मोरे म्हणजे सामाजिक कार्याचा एक आदर्श आहेत. त्यांचे सामाजिक काम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे असेच आहे, असे गौरवोद्गार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले. चंदगड तालुक्यातील कुरणी येथे आज डॉ. जयवंत पाटील संचलित सावली आश्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मागील पंचवीस वर्षे बेळगावात शांताईच्या …

Read More »