पहाटे 4.15 पासून दृश्य : सृष्टीचा अदभुत नजारा निपाणी (विनायक पाटील) : खगोलीय घटनांमध्ये रविवारी (ता.1 मे) पहाटे पूर्व दिशेला गुरू-शुक्र या ग्रहांच्या महायुतीचा अनुभव घेण्याचा विलक्षण योग आहे. आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु व सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र हे यावेळी एकमेकांच्या एकदम जवळ आलेले आपल्याला दिसतील. दरवर्षी ते …
Read More »गोड साखरवाडीत सुटतोय दुर्गंधीचा वारा!
स्वच्छतागृहांना अस्वच्छतेचा वेढा : नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : शहरात पालिकेकडून गरजेच्या ठिकाणी महिला व पुरुषांकरिता स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने व साफसफाई अभावी दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साखरवाडी येथील शौचालया समोर तीन-चार दिवस साठवणार्या कचर्यामुळे गोड साखरवाडीत दुर्गंधीचा वारा सुटत आहे. …
Read More »मूल्यमापन झाले, आता निकालाची प्रतीक्षा!
पाठ्यपुस्तके जमा करण्याची लगबग : अनेक पालक-विद्यार्थी सहलीवर निपाणी (वार्ता) : सलग तीन वर्षे कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देऊन ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. यंदाही कोरोनाची परिस्थिती वाढेल असा अंदाज असतानाच संसर्ग कमी झाल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर पहिली ते नववी निकाल जाहीर करण्यात आला.त्यानंतर …
Read More »अकोळ शर्यतीत बाहुबली पाटील यांची बैलगाडी प्रथम
विविध गटात शर्यती : भैरवनाथ यात्रेची सांगता निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित विनालाठी-काठी बैलगाडी शर्यतीत अकोळच्या बाहुबली पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे 10 हजार 2 रुपये बक्षीस मिळविले. विविध धार्मिक कार्यक्रमांनी या यात्रेची सांगता करण्यात आली. जनरल बैलगाडी शर्यतीत साताप्पा आरडे-वाघापूर, आर. एन. गुडसे यांच्या बैलगाड्यांनी …
Read More »सकल मराठा समाजाच्या “गुरुवंदना” कार्यक्रमाची निपाणी परिसरात जनजागृती
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. 15 मे रोजी भव्य “गुरुवंदना” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बेळगावातील मराठा समाजातील प्रमुखांनी जनजागृती सुरू केली आहे. निपाणी, संकेश्वर, कोगनोळी, उगार, अथणी आदी भागातील मराठा समाजातील प्रमुखांनी किरण जाधव यांच्याशी संपर्क करून कार्यक्रमाच्या जनजागृतीबाबत चर्चा केली आणि माहिती …
Read More »पहिले रेल्वे गेट उद्या बंद
बेळगाव : रेल्वे विभागाने रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे पहिले रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ३८३) चोविस तासांसाठी बंद राहणार आहे. रविवारी (ता. १) सकाळी ८ ते सोमवारी (ता. २) सकाळी ८ पर्यंत हे गेट बंद राहील. यासंबंधी शहर पोलीस आयुक्त कार्यालयातून परवानगी घेण्यात आली आहे. सदरील …
Read More »हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल जप्त
बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी उडुपी पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावात तपास सुरु केला आहे. हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी चालवली आहे. त्यात नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतल्याचे स्पष्ट झाले होते. ही जीपीए का घेतली? …
Read More »अंगणवाडीना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा
महेश जाधव यांचा आरोप कोगनोळी : अंगणवाडीमध्ये पुरवलेल्या धान्यामध्ये काही ठिकाणी उत्तम दर्जाचे तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत आहे. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव यांनी केली आहे. कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोगनोळी हणबरवाडी, दत्तवाडी, कुंबळकट्टी इत्यादीसह परिसरात बारा अंगणवाडीचा समावेश आहे. या बारा …
Read More »अजित पवार, दिलीप वळसे- पाटील यांनी घेतली गडकरींची भेट!
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सावनेर येथील कार्यक्रमानंतर नागपुरात थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे घर गाठून सुमारे पाऊणतास चर्चा केली. यामुळे राजकीय चर्चांनी नवे ’वळसे’ घेतले आहे. तसेच नितीन गडकरी हेच राष्ट्रवादी आणि भाजपातील संवादाचा नवा फ्लायओव्हर असल्याचे संकेत मिळत …
Read More »पटियालामध्ये हाय अलर्ट, इंटरनेट सेवा बंद
पंजाब : पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी दुपारी मिरवणुकीवरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यानंतर राज्यातील पोलिस दल अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आज काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी हिंसाचाराच्या निषेध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta