Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

डॉक्टरी व्यवसायासोबत सेवाभाव महत्वाचा : डॉ. सविता देगीनाळ

  संजीविनी फौंडेशनच्या वतीने सेवाभावी डॉक्टरांचा सन्मान बेळगाव : डॉक्टरी व्यवसायासोबत सेवाभाव महत्वाचा असून आज अशाच सेवाभावी डॉक्टरांना आम्ही सन्मानित करत असल्याचे मत संजीविनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी मांडले. प्रदीर्घकाळ रुग्ण आणि समाजसेवा केलेल्या डॉक्टरांचा ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या प्रास्ताविक करताना बोलत होत्या. …

Read More »

राज्याच्या सचिव (चीफ सेक्रेटरी) शालिनी रजनीश यांच्या विरोधात भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडे समितीची तक्रार दाखल

  बेळगाव : दिनांक 24 जून 2025 रोजी कर्नाटक राज्याचे चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव यांनी एक आदेश काढून राज्यातील सर्व कार्यालयात फक्त कन्नड भाषेचा वापर करावा असा लेखी आदेश काढला, त्या आदेशामुळे सीमाभागात संतापची तीव्र लाट उसळली, कारण त्या आदेशामुळे संपूर्ण सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होणार आहे. कन्नड संघटनेच्या …

Read More »

डॉ. मनीष बरवालिया यांची मराठी विद्यानिकेतन शाळेला सदिच्छा भेट व देणगी…

  बेळगाव : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनचे शास्त्रज्ञ डॉ. मनीष बरवालिया व त्यांचे सहकारी मीनल उत्तम देसाई, जे. डोड्डा बसवा व गौतम जोतिबा नागवडेकर यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. त्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती घेऊन याबाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले. …

Read More »

एएसीपी नारायण बरमणी स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत!

  बेळगाव : बेळगावातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याने नाराज झालेले धारवाडचे एएसपी नारायण बरमणी यांनी सरकारकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. समजावण्यामुळे एएसीपी नारायण बरमणी काहीसे शांत झाल्याचे सांगितले जाते. पण ते झालेल्या अपमानामुळे दुखावले गेले. म्हणूनच, त्यांनी कामावरून …

Read More »

सरकारी मराठी मॉडेल शाळेत मासिक पालक सभेचे आयोजन…

  बेळगाव : सरकारी मराठी मॉडेल शाळेत मंगळवार दिनांक 01/07/2025 रोजी मासिक पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सर्व पालकांचे ईशस्तवन व स्वागत गीताने शाळेच्या विद्यार्थ्यिनी केले. यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम्.एस्. मंडोळकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी केले. यामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, शाळा …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार, वीरवाणीचे संपादक सुनील आपटे कालवश

  बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक वीरवाणीचे संपादक श्री. सुनील गणपतराव आपटे (वय 65) यांचे दि. 2 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सुनील आपटे सिद्धहस्त पत्रकार होते. त्यांनी दै. तरुण भारत, सकाळ, पुढारी, स्वतंत्र प्रगती येथे सेवा बजावली होती. कथा, कविता, संगीतावर त्यांनी अनेक …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे डॉक्टर व सीएंचा सत्कार

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने रोटरी इंटरनॅशनल वर्ष 2025-26 ची सुरुवात एक हृदयस्पर्शी सत्कार समारंभ घेऊन केली. ज्यामध्ये वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिकांचा लक्ष्मी भवन येथे गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. महादेव दिक्षित, डॉ. माधुरी दिक्षित, डॉ. देवगौडा इमगौडनावर, डॉ. सविता कड्डू,, सीए भागू दोयापडे यांचा …

Read More »

भिंत कोसळून लाखोंचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही

  कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरातील घटना कुद्रेमानी : बेळगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात मंगळवार दिनांक ३० जून रोजी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांच्या घराची पश्चिमेकडील संपूर्ण भिंत रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी कोसळली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान …

Read More »

आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार : सिद्धरामय्या

  बंगळुरू : विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याऐवजी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांना खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्णविराम लावला. आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तेच पूर्ण पाच …

Read More »

संगरगाळी गावातील युवकांनी बुजविले स्वखर्चातून खड्डे!

  बेळगाव : पिरनवाडी येथे बेळगाव खानापूर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. खानापूर तालुक्यातील बरेच युवक उद्यमबाग येथे कामानिमित्त येत …

Read More »