खानापूर : खानापूर – यल्लापुर मार्गावरील बिडी नजीक झुंजवाड वळणावर धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सोमवारी सायंकाळी घडली. अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष) कोट्टूर, तालुका-जिल्हा धारवाड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत नंदगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद …
Read More »महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्याकडून कुसमळी पुलाची पाहणी; लवकरच अवजड वाहतूक सुरू होणार
खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी नजीकच्या पुलाची प्रत्यक्ष पाहणी कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी केली असून एका आठवड्यानंतर या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, खानापूरचे तहसीलदार दूंडाप्पा …
Read More »खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना निवेदन सादर
खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना विविध मागण्यांसंदर्भात प्रामुख्याने सरकारी जमिनी बळकावणे आणि कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म संदर्भात निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा आज दि. 30 जून रोजी कुसमळी येथील पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन …
Read More »भाजपचा फायरब्रँड नेता टी. राजा सिंह यांचा राजीनामा
तेलंगणात राज्यातील भाजपचा फायरब्रँड नेता आणि आमदार टी राजा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. पक्षांतर्गत वादाची या राजीनाम्यालादिल्याचे समजते. टी राजा सिंह यांनी पक्षांतर्गत वादातून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. ते गोशामहलमधून भाजपचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते. तेलंगणा …
Read More »गर्लगुंजीत नेम्मदी केंद्र करा; महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांचा सकारात्मक प्रतिसाद
खानापूर : गर्लगुंजी, इदलहोंड, शिंगिनकोप, खेमेवाडी, गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाडअंकले, बाचोळी, शिवाजीनगर आणि इतर गाव जांबोटी येथील नेम्मदी केंद्र येथे जोडण्यात आली आहेत. पण गर्लगुंजी आणि जांबोटीचे अंतर अंदाजे 25 ते 27 कि. मी. आहे. शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक लहान सहान सर्टिफिकेट, वारसा, इन्कम, डोमीसैल, इतर सर्वच …
Read More »खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत खानापूर तालुका समितीच्या वतीने निवेदन सादर
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत आणि मराठी नामफलकाबाबत तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, हेस्कॉम, आरोग्य विभाग आणि बस व्यवस्थापक यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज दि. 30 जून रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, पावसामुळे तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून दैनंदिन वाहतूक …
Read More »इंगळगी मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा; भाजप-श्रीराम सेनेची मागणी
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळगी येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी करत भाजप आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात जोरदार निदर्शने केली. आज बेळगावातील एसपी कार्यालयासमोर भाजप आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुक्केरी तालुक्यातील इंगळगी येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत निदर्शने केली. …
Read More »बेळगावसह कर्नाटकातील चार विमानतळांना धमकीचा ईमेल!
बेळगाव : कर्नाटकातील चार प्रमुख विमानतळांना बॉम्ब स्फोट घडवून उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली. बेळगाव, हुबळी, मंगळुरू आणि बेंगळुरू या कर्नाटकातील विमानतळांना बॉम्ब स्फोट घडवून उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल विमानतळांच्या संचालकांना पाठवण्यात आला. त्यामुळे सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. “रोडकिल क्यो” नावाच्या ईमेल आयडीवरून सदर …
Read More »नेगील योगी रयत सेवा संघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बेळगाव : नेगील योगी रयत सेवा संघ कर्नाटक बेळगाव शाखा यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सहाय्यकानी शेतकऱ्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला व सदर निवेदन लवकरात लवकर शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात …
Read More »इंगळगी मारहाणी प्रकरणी चार जणांना अटक
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणी चार जणांना गजाआड करण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली. पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, काल हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta