Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

बंकी येथे अन्नातून विषबाधा झालेल्या 11 जणांपैकी एकाच मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बंकीबसरीकट्टी गावातील एका कुटुंबाला एम. के. हुबळी येथे लग्न समारंभात जेवण करून घरी आल्यानंतर रात्री उलटी जुलाब झाल्याने 11 जणांना नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या सर्वाना अन्नातून विषबाधा झालेला होता. यामध्ये तुषार महमद जमादार (वय 12) याचा गुरुवारी मृत्यू झाला. तो येथील …

Read More »

विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत अन् साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत! : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे

पुणे : साहित्यिक प्रेम वाटतो, जाणिवा विकसित करतो; पण आजच्या साहित्यिकातील लेखक असंवेदनशील झाला असून, ही अराजकतेची सुरुवात आहे. भयामध्ये वावरणारा सामान्य माणूस आणि समाज आतला आवाज गमावून बसला आहे. लोक नको त्याचे समर्थन करू लागल्याने वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे. विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत. साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत. …

Read More »

बायपासची स्थगिती कायम; शेतकर्‍यांना दिलासा

बेळगाव : वादग्रस्त हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आज झालेल्या न्यायालयीन सुनावणीप्रसंगी शेतकर्‍यांच्या हरकत अर्जातील मुद्दे पटल्याने आणि शेतकर्‍यांची बाजू भक्कमपणे मांडण्यात आल्यामुळे बायपासच्या कामावरील स्थगिती आदेश न्यायालयाने पुन्हा य कायम केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांची बाजू भक्कम असल्याचे परत एकदा स्पष्ट झाले असून त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. हलगा-मच्छे बायपास …

Read More »

आक्षेपार्ह सीडी प्रकरण; पोलीस आयुक्त, डीसीपी, निरीक्षकांविरुद्ध एफआयआर

शहर न्यायालयाचा आदेश, पोलिस अधिकार्‍यांची उच्च न्यायालयात धाव बंगळूर : शहर न्यायालयाने कब्बन पार्क पोलिसांना बंगळुरचे पोलीस आयुक्त कमल पंत, डीसीपी (मध्य) एम. एन. अनुचेत आणि कब्बन पार्क पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. मारुती यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी 2 मार्च 2021 रोजी तत्कालीन मंत्री …

Read More »

केंद्र सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा!

महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज कोल्हापूर : ‘सनातन धर्म’ एक महान धर्म आहे आणि याचा कुठलाही पर्याय या जगात नाही. याच आपल्या धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच या देशाला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय …

Read More »

….तब्बल 66 वैद्यकीय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!

हुबळी : महाविद्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामुळे कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊन हुबळीच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 66 विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून महाविद्यालयातील कार्यक्रमात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास …

Read More »

गणेबैलजवळ टोलनाका स्थानिक वाहन चालकाना भुर्दंड होईल का?

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव लोंढा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या महामार्गाच्या चौपदीकरणाने सामान्य जनतेला मेटाकुटीस आणले आहे. खानापूर तालुक्यातील प्रभनगरपासून ते लोंढ्यापर्यंत अनेक गावच्या शेतकरीवर्गाची जमिन या महामार्गाच्या चौपदीकरणाने काढून घेतली आहे. त्याचा मोबदला कमी प्रमाणात दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वर्गाने कोर्टात धावून जमिनीची रक्कम वाढवून देण्याची …

Read More »

कोगनोळी येथील मुख्य रस्त्याला वाली कोण

रस्त्याची दुरावस्था : नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया कोगनोळी : येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते भगवा सर्कल इथे पर्यंतचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून याठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झाली असून त्या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न कोगनोळी …

Read More »

पराभवाचे खापर जारकीहोळींच्या माथ्यावर….!

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधान परिषद निवडणुक हार-जीतचा फैसला जारकीहोळी बंधुंवर असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाने पराजयाची खापर जारकीहोळी बंधुंवर फोडण्याचा इरादा पक्का केलेला दिसत आहे. बेळगांव विधानपरिषदची निवडणूक तशी तिरंगी अत्यंत चुरशीने होणार आहे. निवडणुकीत भाजपाने महांतेश कवठगीमठ यांना तर काँग्रेसने चन्नराज हट्टीहोळी यांना आखाड्यात उतरविले …

Read More »

शिनोळी येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर; बेळगावातील सहा जणावर गुन्हा दाखल

शिनोळी (एस. के. पाटील ) : मटक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिनोळी (ता. चंदगड ) येथे चंदगड पोलिसांनी छापा मारून बेळगाव शहर परिसरातील सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला. शिनोळी येथे सदर जुगार अड्डा बेकायदेशीररित्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता येथे जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले. …

Read More »