मतदारसंघात पिण्याचे पाणी, रस्ता, शाळा इमारत, देवस्थान जीर्णोद्धार आदी कामे राबविली आहेतबेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळेभावी येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विकासकामाचे स्थानिक लोकप्रतिनिधी व लक्ष्मीताई को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चन्नराज हट्टीहोळी यांनी भूमीपूजन केले.सदर विकासकामासाठी एकूण 3.80 कोटी रुपये इतका खर्च येणार असून, नागरिकांना व रस्त्याला अडचण होऊ …
Read More »नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट : आमदारांचे मुख्यमंत्र्यांनी केले विशेष कौतुक
तळागाळापर्यंत विकासाची गंगा पोहोचवा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन बेळगाव : आज राज्याच्या राजधानीत बेळगाव महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान करून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बैठक गृह भगवेमय बनले होते. जणू हिंदुत्वाची गंगा राज्याच्या राजधानीत पोहोचल्याची अनुभूती या कार्यक्रमाने आली. महापालिका निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व असे यश मिळाल्याने …
Read More »इंधन दर वाढीचा निषेध : अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच आंदोलन
बंगळूरू : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काही काँग्रेस आमदार आणि नेत्यांनी विधानसौधपर्यंत बैलगाडीतून प्रवास केला. कुमारकृपा सरकरी निवासातून सिध्दरामय्या, सदाशिवनगर येथील घरापासून डी. के. शिवकुमार बैलगाडीत बसून विधानसौधला जायला निघाले असता हजारो …
Read More »विसर्जन मिरवणूक नाहीच, बाप्पाला निरोप देण्यासाठी पाचच कार्यकर्ते
बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्या वर्षी राज्य शासनाने कर्नाटक राज्यातील गणेशोत्सवावर निर्बंध लादले आहेत. दरम्यान कर्नाटक राज्यात पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असताना, बेळगावात यावर्षी दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी परवानगी दिली आहे. दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात रीतसर आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ …
Read More »संत मीरा शाळेत गणहोम
बेळगाव : मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा सहावी ते दहावी शाळा सुरू करून देण्यास परवानगी दिली. त्याचे औचित्य साधून संत मीरा इंग्रजी शाळेत गणहोम करण्यात आले. शाळा सुधारणा समिती सदस्य अनंतराम कल्लुराया व पत्नी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, इन्चार्ज विणाश्री …
Read More »काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन
बेंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे आज सोमवारी मंगळूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. काँग्रेस पक्षासह केंद्रात महत्त्वाची जबाबदारी पार पडलेले ऑस्कर फर्नांडीस गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जात. ऑस्कर फर्नांडीस यांच्या निधनानिमित्त काँग्रेससह विविध पक्षातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Read More »तुर्केवाडी येथील अमन शेखने पटकावले सुवर्णपदक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय मिशन ऑलिम्पिक खेल संघ द्वारा मध्य प्रदेश येथील उजैन येथे घेण्यात आलेल्या चौथ्या नॅशनल चॅम्पियनशिप 2021 ऑगस्टमध्ये कबड्डी या खेळ प्रकाराततुर्केवाडी तालुका चंदगड येथील अमन सलाउद्दीन शेख याने सुवर्णपदक प्राप्त करून तालुक्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजविलेबद्दल त्याचे अभिनंदन होते आहे.त्याचबरोबर अमनला …
Read More »डॅनिल मेदवेदेवने पटकावले ‘अमेरिकन ओपन’चे विजेतेपद
न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच याला पराभवाचा धक्का बसला. त्याचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपद पटकावून २१ ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्याचा आणि यंदा सर्वच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे स्वप्नभंग झाले. अंतिम सामन्यात रशियाच्या दुसर्या मानांकित डॅनिल मेदवेदव यांनी बाजी मारली. मेदवेदेवने जोकोव्हिच याचा …
Read More »चिक्कबळापूरजवळ भीषण अपघात : जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू
चिक्कबळापूर – ट्रक आणि जीपची जोरधार धडक होऊन भीषण अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. व दहा जणांना पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकमधील चिक्कबळापूर जिल्ह्यात चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ भीषण अपघात झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच चिंतामणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून बचाव कार्य केले. व जखमींना …
Read More »पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना “वृषभश्री” पुरस्कार
बेळगाव : बेळगावातील पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना “वृषभश्री” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल कर्नाटक जैन अल्पसंख्याक संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्य पातळीचा हा पुरस्कार. मागील अनेक वर्षांपासून कुंतीनाथ कलमनी हे जैन समाजामध्ये समाजसेवा करत आले आहेत. या समाजसेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच बेंगलोरचे डॉ. नीरजा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta