बेळगाव : बेळगावच्या रुक्मिणी नगरमध्ये मुसळधार पावसामुळे एका कारवर भलेमोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. बेळगावात पावसाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. शहरातील रुक्मिणी नगर येथे मुसळधार पावसामुळे घरासमोर उभ्या असलेल्या कारवर एक भलेमोठे झाड कोसळले. यामुळे कारचे मालक, रुक्मिणी नगर येथील प्रदीप हुलकुंड यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले …
Read More »बसमधील खिडकीकडे बसण्यावरून विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार; विद्यार्थी गंभीर जखमी
बेळगाव : बसच्या खिडकीकडे बसण्यावरून विद्यार्थ्यावर अज्ञात तरुणांच्या एका गटाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना आज बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर घडली. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर, बसच्या खिडकीच्या सीटसाठी अज्ञात तरुणांचे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी भांडण झाले, भांडण वाढले आणि विद्यार्थ्याच्या छातीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि तो पळून गेला. …
Read More »निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) यांचे बेळगाव येथील रुग्णालयात बुधवारी (ता.१८) अल्पशा आजाराने निधन झाले. माजी आमदार काकासाहेब पाटील यांची मागील काही दिवसापासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेले ४० दिवस बेळगाव मधील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापासून तब्येतीमध्ये काही …
Read More »उपनिबंधक पदी रवींद्र पाटील यांची फेरनिवड
बेळगाव : बेळगाव जिल्हा सहकारी संघाच्या उपनिबंधक म्हणून रंजना पोळ यांनी मागच्या आठवड्यात पदभार स्वीकारला होता. या निवडीविरुद्ध उपनिबंधक रवींद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांची मागणी मान्य करून उच्च न्यायालयाने आज रवींद्र पाटील यांची उपनिबंधक म्हणून फेरनिवड केली असून ते उद्या बुधवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.
Read More »‘वेगा हेल्मेट’ कंपनीच्या कर थकबाकीवरून महापालिका बैठकीत वादळी चर्चा
सखोल चौकशी करून रक्कम वसूल करा ; महापौर मंगेश पवार यांचे निर्देश बेळगाव : बेळगावातील प्रतिष्ठित ‘वेगा हेल्मेट’ कंपनीने महापालिकेला सात कोटींहून अधिक रुपयांची करचुकवेगिरी केल्याच्या आरोपावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ती रक्कम वसूल करावी, असे निर्देश महापौर मंगेश पवार यांनी दिले. मंगळवारी बेळगाव महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये …
Read More »नैवेद्य दाखवताना कृष्णा नदीत बुडून महिलेचा मृत्यू
चिक्कोडी तालुक्याच्या मांजरी गावातील घटना चिक्कोडी : नैवेद्य दाखवत असताना पाय घसरल्याने कृष्णा नदीत पडलेल्या एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात ही घटना घडली. संगीता शिवाजी मांजेकर (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळी नैवेद्य दाखवत असताना पाय घसरून ती नदीत पडली. …
Read More »चापगांव परिसरात अस्वलाची दहशत; वनखात्याने बंदोबस्त करावा
शेतकऱ्यांचे जिल्हा मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्यांना निवेदन! खानापूर : चापगांव (ता.खानापूर) गावच्या परिसरात पिल्लासह एका अस्वलाचा वावर होत असून त्याच्यापासून शिवारात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. त्या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन चापगांव परिसरात शेतकऱ्यांनी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांच्या नेतृत्वाखाली बेळगांव जिल्हा मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्यांना …
Read More »कै. नारायणराव मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे रणझुंझार शिक्षण संस्थेत शालोपयोगी साहित्याचे वितरण
बेळगाव : रणझुंझार शिक्षण संस्थेचे रणझुंझार हायस्कूल विद्यामंदिर व काॅन्व्हेंट स्कूल निलजी मध्ये कै.नारायणराव चुडामणी मोदगेकर यांच्या स्मरणार्थ कै. नारायण चुडामणी मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक मारुती गाडेकर हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रणझुंझार साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब नारायण …
Read More »‘गोष्ट इथे संपत नाही’ कार्यक्रमाला बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
बेळगाव : महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातील अतुल्य आणि अद्भुत शौर्यगाथा असलेल्या अफजल खान लढाईचा पट सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांनी रविवारी उलगडला. यामुळे चिंतामणराव ज्युबिली हॉलमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींना एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार होता आले. अनेकांनी ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाची मुक्तपणे …
Read More »जायंट्सचे सामाजिक कार्य प्रेरणादायी : जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे
कै.नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्ताने जायंट्स मेनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न बेळगाव : जायंट्सचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. जायंट्स मेनच्या वतीने कै. नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी ते बोलत होते. के एल ई हॉस्पिटलच्या रक्तपेढीत झालेल्या शिबिराची सुरुवात राहुल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta