बेळगाव : नुकत्याच दिनांक 12 ते 17 डिसेंबर रोजी दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात 69 व्या नॅशनल स्कूल गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू व जी. जी. चिटणीस स्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदा वैभव खानोलकर हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 4 x …
Read More »समाज सारथी सेवा संघाची येळ्ळूरमध्ये स्थापना
येळ्ळूर : येळ्ळूर मधील समान विचार आणि ध्येय असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक किंवा सामुदायिक समस्या सोडवण्यासाठी तसेच कल्याणकारी कार्य करण्यासाठी एक संघटित शक्ती निर्माण करण्याचा उद्देश ठेवून गावामध्ये समाज सारथी सेवा संघाची स्थापना केली आहे. संघटनेच्या माध्यमातून सामूहिक ध्येय साध्य करणे, समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे …
Read More »बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासावर भर द्या : आम. अभय पाटील
बेळगाव : बेळगाव सीमावर्ती भाग असूनही गेल्या 50 वर्षांपासून सर्वच सरकारांनी या शहराकडे दुर्लक्ष केले आहे. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज विधानसभेत करून सरकारचे लक्ष वेधले. आज विधानसभेत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, बेळगाव सीमावर्ती भागात असल्याने …
Read More »कर्नाटक बालविकास अकादमीचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
बेळगाव : “मुलांवर कोणताही अनावश्यक दबाव न टाकता त्यांच्या आवडीच्या निवडीला पालकांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मात्र, त्याच वेळी पालकांची स्वप्ने पूर्ण करणे हे देखील मुलांचे कर्तव्य आहे,” असे मत महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. सुवर्ण विधानसौध सभागृहात कर्नाटक बालविकास अकादमीच्या पुरस्कार वितरण समारंभात त्या …
Read More »दोनच दिवसात अलंग, मदन कुलंगा किल्ला सर
बेनाडी ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या; आजपर्यंत ६८ किल्ल्यांची भ्रमंती निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील व लखन माळी यांच्यासह सदस्यांनी महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर ४ हजार ८०० फुटावर असलेल्या अलंग, मदन, कुलंग (एएमके) हे तीन किल्ले केवळ दोन दिवसात सर करण्याचा उपक्रम राबविला. हे …
Read More »कॅपिटल वन 14 वी एकांकिका स्पर्धा 20 व 21 डिसेंबर रोजी
बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेतर्फे सलग 14 वर्षी भव्य एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यामधील संघांची अभासी तत्वावर निवड करून दिग्गज संघांचा समावेश या आंतरराज्य स्पर्धेमध्ये करण्यात येणार आहे. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटामध्ये देखील स्पर्धा भरविण्यात …
Read More »माहेश्वरी अंध शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तज्ञांकडून नेत्र तपासणी
बेळगाव : समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो ही संकल्पना मनात बाळगत बेळगाव येथील नेत्र तज्ञ डॉक्टर हर्षवर्धन पाटील आणि डॉक्टर प्रसाद जिरगे यांनी बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्था संचलित माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वतःच्या दवाखान्यात मशीनच्या सहाय्याने डोळे तपासले. माहेश्वरी अंधशाळेतील 117 अंध विद्यार्थ्यांचे दररोज वीस याप्रमाणे डोळे तपासून चाळीस विद्यार्थ्यांना …
Read More »फुलबाग गल्ली परिसर समस्यांच्या विळख्यात; संबंधित खात्याने समस्या तात्काळ सोडवाव्यात
बेळगाव : फुलबाग गल्ली येथे गटारीचे काम सुरू असताना तेथील रहिवाशांच्या ड्रेनेज टाईप खराब झाल्या आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही ही बाब स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी ड्रेनेज पाईप दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते परंतु चार दिवस उलटले तरी देखील महानगरपालिकेने याची …
Read More »२५ वर्षांनंतर जागवल्या आठवणी: माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पिरनवाडी येथील कर्मवीर विद्यामंदिर हायस्कूलच्या सन २००१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व गुरुवंदना कार्यक्रम रविवारी १४ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. “एक दिवस पुन्हा शाळेत जाऊया, लहान होऊया” या भावनेतून तब्बल ७० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी अनेक माजी शिक्षकही उपस्थित होते. …
Read More »खडतर मेहनतीला मिळाले आकाशाचे (यशाचे) पंख; म. मं. ताराराणी काॅलेजची कु. ऋतुजा पागाद वायुसेना दलात दाखल!
खानापूर : कठोर मेहनत आणि देशसेवेची जिद्द यांच्या जोरावर ताराराणी काॅलेजची कु ऋतुजा पागाद हिने भारतीय वायुसेनेत आपला दमदार प्रवेश केला आहे. कुमारी ऋतुजाच्या या यशामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव उंचावला असून काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी ती दीपस्तंभ बनली आहे . आजवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta