Monday , September 21 2026
Breaking News

पावसाचा पुन्हा जोर; १० जुलैपर्यंत मुसळधार सरींचा इशारा

Spread the love

 

बेळगावसह चार जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे सावट; पूर, भूस्खलन आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता

बेळगाव : रविवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावत संततधार सुरू केली आहे. त्यामुळे जनजीवनावर पुन्हा पावसाचे सावट गडद झाले असून १० जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार बेळगाव, शिमोगा, चिकमंगळूर आणि हासन या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय उत्तर व दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सततच्या पावसामुळे शहरी भागांत पाणी साचणे, सखल वस्त्यांमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण होणे, डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका वाढणे तसेच प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या असून, नदी-नाल्यांच्या काठावरील तसेच डोंगराळ भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *