Monday , September 21 2026
Breaking News

संकटात वेळ दवडू नका; थेट ‘112’ वर कॉल करा!

Spread the love

 

 

पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका सेवा एका कॉलवर; बेळगाव शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बेळगाव : कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीची मदत मिळावी आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून जलद प्रतिसाद देता यावा, यासाठी २४ तास कार्यरत असलेली राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाइन सेवा ‘डायल 112’ नागरिकांसाठी उपलब्ध आहे. कोणतीही आपत्ती किंवा जीवितास धोका निर्माण झाल्यास क्षणाचाही विलंब न करता 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बेळगाव शहर पोलिसांनी केले आहे.

‘डायल 112’ या एकात्मिक आपत्कालीन प्रतिसाद सेवेची माहिती शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये जनजागृती अभियानाद्वारे दिली जात आहे. गुन्हेगारी घटना, संशयास्पद हालचाली, महिलांवरील अत्याचार, रस्ता अपघात, वैद्यकीय मदतीची आवश्यकता किंवा जीवितास धोका निर्माण करणारी कोणतीही घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने 112 वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

‘112’ हा देशातील एकात्मिक आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक असून, या एका कॉलद्वारे पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांशी त्वरित संपर्क साधता येतो. त्यामुळे मदत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून आपत्कालीन परिस्थितीवर जलद नियंत्रण मिळविणे शक्य होते.

नागरिकांनी सतर्क राहून परिसरातील कोणतीही संशयास्पद बाब अथवा गंभीर घटना निदर्शनास आल्यास त्वरित 112 वर संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, या हेल्पलाइनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन परिस्थितीतच करावा. खोटे कॉल करणे, चुकीची माहिती देणे किंवा सेवेचा गैरवापर करणे कायद्याने दंडनीय असून, असे प्रकार टाळावेत, असेही बेळगाव शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *