Monday , September 21 2026
Breaking News

जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Spread the love

 

बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांनी आपल्या कार्यालयात भारताचे प्रख्यात राष्ट्रवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्राच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे डॉ. मुखर्जी हे भारतीय इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

“एक विधान, एक निशाण, एक प्रधान” या त्यांच्या विचारसरणीने देशातील एकसंघ राष्ट्रीय ओळखीचा मजबूत संदेश दिला असून, एकसमान संविधान व राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमात “एक विधान, एक निशाण, एक प्रधान” या घोषणेचा पुनरुच्चार करत राष्ट्रनिर्मिती, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी राजन जाधव, दिनेश शिरोळकर, मयूर जाधव, विनायक शिनगावकर तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *