Monday , September 21 2026
Breaking News

देवेंद्र जिनगौडा, हनिवेल, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

Spread the love

 

बेळगाव : खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विविध गटात आणि हनिवेल स्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, देवेंद्र जीनगौडा स्कूल या शाळेनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेच्या उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून लैला शुगरचे संचालक सदानंद पाटील, शांतीनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे तसेच शाळेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा भोसले, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, शांतिनिकेतन शाळेचे क्रीडाशिक्षक ओमकार गावडे, सागर कोलेकर, शिवकुमार सुतार मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सदानंद पाटील यांच्या हस्ते नेटपूजन व श्रीफळ वाढवुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यानंतर खेळाडूंची ओळख करून खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले सदानद पाटील म्हणाले की, अभ्यासाबरोबर खेळालाही महत्व देणे गरजेचे आहे मोबाईल पासून दूर राहणे तसेच आई-वडिलांच्या व शिक्षकांच्या अज्ञात राहून आपल्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे.
यानंतर 14 व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या गटात देवेंद्र जीनगौडा, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, हनिवेल स्कूल खानापूर, या संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *