Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची गुरुवारी सकाळी ९ वाजता नाष्टा पार्टी; उद्या राजीनामा शक्य

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानी मंत्र्यांसाठी नाष्टा पार्टीचे आयोजन केले असून, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीहून येऊन थेट यात सहभागी होतील. डी. के. शिवकुमार यांच्या प्रवासाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले असून, ते गुरुवारी सकाळी ५.४५ वाजता नवी दिल्लीहून निघून सकाळी ८ वाजता बंगळूर विमानतळावर …

Read More »

विधान परिषदेच्या ७ जागांसाठी १८ जूनला निवडणूक

  बंगळूर : राज्यातील सात विधान परिषद सदस्यांच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. विधान परिषद सदस्य गोविंद राजू, नासीर अहमद, एन. नागराजू, प्रतापसिंह नाईक के., तिप्पण्णप्पा, …

Read More »

‘द्वेषपूर्ण भाषण’ विधेयकाला केंद्राचा आक्षेप

  विद्यमान कायदेच पुरेसे असल्याचे मत बंगळूर : राज्यातील ‘द्वेषपूर्ण भाषण’ रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कर्नाटक द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेष अपराध (प्रतिबंध) विधेयक, २०२५ या महत्त्वाच्या विधेयकाला केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला आहे. या टप्प्यावर स्वतंत्र कायद्याची आवश्यकता नसून विद्यमान कायदेशीर चौकटच या समस्येवर उपाय करण्यास सक्षम असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य …

Read More »

दिवसाढवळ्या घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद; 23 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडीच्या मालिकेमागील सराईत चोरट्याला अटक करून तब्बल 23 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दि. 10 मे 2026 रोजी शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम नगर येथे कुलूप लावलेल्या घराचा दरवाजा …

Read More »

४,५०० कोटी घोटाळा प्रकरण : आलिशान कार भेट प्रकरणी करवे जिल्हाध्यक्ष आर. अभिलाष सीआयडीसमोर हजर

  बेळगाव : बेळगावमध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या तब्बल ४,५०० कोटी रुपयांच्या कथित ठेवधारक फसवणूक प्रकरणाचा सीआयडी तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढत आहे. मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याच्याकडून आलिशान कार भेट म्हणून स्वीकारल्याच्या आरोपावरून ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ (प्रवीण शेट्टी गट) चे जिल्हाध्यक्ष तथा अभिनेते आर. …

Read More »

नेसरीकर प्लॉट रेणुका मंदिर परिसरात ऑक्सिजन पार्क उभारणीचा शुभारंभ

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नेसरीकर प्लॉटमधील रेणुका मंदिर परिसरात नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी बगीचा निर्मिती उपक्रमाचा प्रारंभ भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी, परिसरात वाढते प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रत्येक …

Read More »

सहकाररत्न उत्तम पाटील प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत ममदापूर केएल मधील साई स्पोर्ट्स क्लब विजेता

  निपाणी (वार्ता) : ममदापुर (के.एल.) येथील एस. टी. बॉइजतर्फे उत्तम पाटील प्रीमियर लिग २०२६ मधील चौथ्या पर्वातील क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये ममदापूर (के.ए.) येथील साई स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांकाचे २५ हजार रुपये आणि चषक पटकाविले. सहकाररत्न उत्तम पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीसे देण्यात आली. …

Read More »

डंपर – दुचाकी अपघातात रांगोळीचा युवक ठार; मानकापूर जवळील घटना

निपाणी (वार्ता) : कारदगा-मानकापूर फाट्याजवळ डंपर व मोटारसायकलची धडक होऊन रांगोळी येथील महाविद्यालय विद्यार्थी ठार झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. गणेश बाबासाहेब कांबळे (वय १८) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अर्जुन रमेश मिरजे (वय १८) साहिल कुबेर कांबळे (तिघेही रा. रांगोळी) गंभीर जखमी झाले आहेत. अर्जुन मिरजे …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक २७/०५/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली असून बैठकीला सर्व पदाधिकारी, संघटक, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.

Read More »

कायद्याच्या चौकटीत बकरी ईद साजरा करण्याचे निपाणी पोलीस उपनिरीक्षकांचे आवाहन

  निपाणी (वार्ता) : कायदा व नियमाच्या चौकटीत बकरी ईद सणाचे महत्त्व जोपासून हा सण शांततेत साजरा करा. हिंदू मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा जोपासावा, असे आवाहन पोलीस उप निरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी केले. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. निपाणी परिसरात अनेक सण उत्सव हिंदू-मुस्लिम बांधवांच्यावतीने …

Read More »