Monday , September 21 2026
Breaking News

मुसळधार पावसामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळा, अंगणवाड्या आणि पीयूसी महाविद्यालयांना उद्या सुट्टी

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेळगाव व खानापूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (बारावीपर्यंतच्या) महाविद्यालयांना उद्या दि. मंगळवार 7 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे. जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *