Sunday , September 20 2026
Breaking News

चलवेनहट्टी – अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचे वृक्ष कोसळले

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी – अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचा मोठा वृक्ष कोसळल्याने बेळगाव शहर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पण या घटनेची माहिती मिळताच अगसगे ग्रामपंचायत उपाध्यक्ष आणी कार्यशील सदस्य गुंडू कुरेण्णवर हे ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी उमेश कांबळे आणी लक्ष्मण कंग्राळकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. उमेश कांबळे आणी लक्ष्मण कंग्राळकर याच्या मदतीने झाड हटविले. आणी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. आणी अडकून पडलेली वाहतूक सुरळीत झाली.
गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे आशातच मध्यरात्री सोसाट्याच्या ‌वाऱ्याने बाभळीचा मोठे झाड मुख्य रस्त्यावर कोसळल्याने‌ प्रवाशांची मोठी गैरसोय झाली तर कामानिमित्त पहाटे जाणाऱ्यांची देखील अचानक समोर कोसळलेल्या झाडामुळे तारांबळ उडत असल्याने अपघात होण्याची शक्यता होती.
तसेच शाळा महाविद्यालयाना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आल्याने वर्दळ कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटेची वेळ असल्याने रस्ता मोकळा करण्यासाठी वनरक्षक किंवा प्रशासनला संपर्क होत नव्हता, त्यामुळे बस सह चार चाकी आणी दुचाकी वाहना धारकांना मनस्ताप सहन करावा लागला, तातडीने जाणाऱ्या प्रवाशांना हंदिगनूर मण्णीकेरे या गावाना वळसा घालून जावे लागले.
यावेळी परीस्थिती लक्षात घेऊन गुंडू कुरेण्णवर यांनी निर्माण झालेल्या समस्येचे तातडीने निवारण केल्याने प्रवाशांना समाधान व्यक्त केले आणी गुंडू कुरेण्णवर यांचे आभार मानले

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *