Sunday , July 26 2026
Breaking News

भाग्यनगर येथे कारवर झाड कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जनजीवनाला बसत असून, सोमवारी भाग्यनगर येथील तिसऱ्या क्रॉसमध्ये एक मोठे झाड कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.

सततच्या पावसामुळे झाडाची मुळे कमकुवत झाल्याने रस्त्यालगतचे हे मोठे झाड अचानक कारवर कोसळले. या दुर्घटनेत कार पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली.

झाड कोसळताना जवळील वीज खांबही पडल्याने भाग्यनगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच वीजपुरवठाही खंडित झाला. सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या.

घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि हेस्कॉमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड व वीजतारा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या कामात स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात झाडे कोसळणे, घरांचे नुकसान होणे आणि रस्त्यांवर पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची तातडीने पाहणी करून ती हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. ही घटना टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *