Monday , September 21 2026
Breaking News

आनंदनगर अंधारात; तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव, नागरिक संतप्त!

Spread the love

 

वारंवार खंडित होणारा व कमी दाबाचा वीजपुरवठा; घरगुती उपकरणे धोक्यात, हेस्कॉमच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

बेळगाव : वडगाव येथील आनंदनगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. थोड्याच वेळासाठी वीज आली तरी ती अत्यंत कमी दाबाने येत असल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे.

सकाळच्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेतही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने महिलांची दैनंदिन कामे ठप्प होत आहेत. पाणी भरण्यापासून स्वयंपाकापर्यंत प्रत्येक कामावर त्याचा परिणाम होत आहे. दुसरीकडे, सतत कमी-जास्त होणाऱ्या व्होल्टेजमुळे फ्रिज, वॉशिंग मशीन, पाण्याच्या मोटारी, टीव्ही आणि इतर महागडी विद्युत उपकरणे निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच घरून काम करणाऱ्यांचेही मोठे हाल होत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने हेस्कॉमच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आनंदनगर परिसरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून कमी दाबाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *