Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी ‘जवाहर’ तलावाची पाणी पातळी ३२.२ फुटावर

Spread the love

 

आठवडाभरात ११ इंचानी वाढ: शिरगुप्पी ओढ्यातून तलावात पाणी

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे निपाणीची जीवनदायिनी असणाऱ्या जवाहर तलावाच्या पाणी पातळीत ११ इंचानी वाढ झाली आहे. पावसापूर्वी ३० फुट असलेली पाणी पातळी सोमवारी (ता.६) ३२.३ फुट इतकी झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात मान्सून असाच राहिल्यास तलाव भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी वेळेत मान्सून सुरू झाल्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दोन वेळा तलाव भरून ओव्हर फ्लो झाला होता. त्यानंतर सलग चार दिवस पाणी तलावाबाहेर पडत होते. आता सुरू असलेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामात लवकर तलाव भरून शहराचा पाणी प्रश्न निकालात निघण्याची अशा व्यक्त केली जात आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शिरगुप्पीसह परिसरातील पाणी ओढ्याद्वारे तलावात येत आहे. शिवाय वेदगंगा नदीतील पाणी पातळीही वाढली आहे. यंदा जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे तलाव ओव्हर फ्लो होऊन यंदा तरी शहरवासियांना २४ तास पाणी मिळणार का असा प्रश्न शहरवासीयातून विचारला जात आहे.
जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील डोंगर भागातून ओढ्यांचे पाणी मिसळत आहे. त्यामुळे झपाट्याने पातळीत वाढ होणार आहे. गतवर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने २२ जुलैला जवाहर तलाव ओसंडून वाहू लागला होता. यंदा तलावातील पातळी कमी असल्याने महिन्यापासून पालिकेकडून शहर, उपनगराला ५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तलावाची ४६ फूट एक इंच पाणी पातळी झाल्यानंतर पश्चिमेकडील सांडव्यातून पाणी बाहेर पडणार आहे. गतवर्षी सांडव्यावर काही प्रमाणात बरगे घातल्याने तलावातील पाणी पातळी वाढली होती.
——————————————————————–
तलावातील गाळ काढण्याची योजना हवेतच
दोन वर्षांपूर्वी ‌ जवाहार तलावातील गाळ काढण्याची योजना तयार केली होती. प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली. पण किरकोळ पाऊस होताच काम बंद करण्यात आले. त्यामुळे गाळ काढण्याची योजना हवेतच विरल्याची चर्चा सुरू आहे. गतवर्षी गाळ काढला असता तर यंदा तलावाची पाणी पातळी वाढली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
——————————————————————–
‘यंदा जुलै च्या प्रारंभापासून मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. आठवड्याभरात जवाहर तलावाची पाणी पातळी ११ इंचानी वाढली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास तलाव भरण्यासाठी चांगली मदत होऊन उन्हाळ्यात चांगला प्रकारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.’
– गणपती पाटील, आयुक्त, निपाणी नगरपालिका

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *