बेळगाव : पीएसआयच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण उपचारादरम्यान “त्या” तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील रामनगर, हनुमान गल्ली येथील रहिवासी भास्कर बोंडेलकर याने एका प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे जोयडा येथील रामनगर पीएसआय बसवराज मगनूर …
Read More »कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
बंगळूर : कर्नाटकमध्ये इंधनाच्या किमतीत तीन रुपयांहून अधिक वाढ झाली आहे, कारण राज्य सरकारने शनिवारी (ता. १५) पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला आहे, जो तत्काळ लागू होईल. शनिवारी राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, कर्नाटक विक्रीकर (केएसटी) पेट्रोलवरील २५.९२ टक्क्यांवरून २९.८४ टक्के आणि डिझेलवर १४.३ टक्क्यांवरून १८.४ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे …
Read More »शहापूरात दोन घरांना शॉर्टसर्किटमुळे आग : लाखो रुपयांचे नुकसान
बेळगाव : बेळगाव येथील शहापूर येथील होसूर हरिजन गल्ली येथे एका कुटुंबातील दोन घरांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील पैसे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शिवराज अशोक मोदगे व शशिकांत मोदगे यांच्या घरात विवाह सोहळा असल्याने घरात ठेवण्यात आलेले पैसे, दागिन्यांसह …
Read More »आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंचे घवघवीत यश
बेळगाव : फोंडा गोवा येथे नुकत्याच साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील जलतरण तलावात संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूणी घवघवीत यश संपादन करताना द्वितीय क्रमांकासह तीन वैयक्तिक चॅम्पियनशिप तसेच रनर्सअप चॅम्पियनशिप पटकाविली. यांनी या स्पर्धेत एकूण 67 पदके पटकाविली यामध्ये 26 सुवर्ण 20 रौप्य …
Read More »एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं सूचक विधान
नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते, असे विधानही त्यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४० जागांवर विजय मिळविला. बहुमताचा २७२ हा आकडा त्यांना …
Read More »खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक संपन्न
खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता संघटनेचे अध्यक्ष श्री. बनोसी सर यांच्या निरीक्षणाखाली संपन्न झाली. जनरल सेक्रेटरी श्री. पवार यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. …
Read More »साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण” या कादंबरीला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – २०२४ जाहीर
ठाणे : ठाणे शहरातील नव्या दमाचे व सतत वास्तववादी विषयावर रोखठोक व परखडपणे आपल्या लेखणीतून लेखन करणारे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी लिहिलेल्या ” प्रेयसी एक आठवण..” सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला नामवंत जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउदेशीय संस्था महागाव, जि.कोल्हापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकाच्या उत्कृष्ट साहित्य …
Read More »राज्यात ४५ हजार अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीला अनुमती
प्राथमिक ३५ हजार, माध्यमिक १० हजार शिक्षकांची नियुक्ती बंगळूर : शालेय शिक्षण विभागाने सरकारी प्राथमिक शाळांसाठी ३५ हजार आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी १० हजार अशा एकूण ४५ हजार अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील सुमारे ४९ हजार ६७९ सरकारी शाळांमधील अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. त्यामुळे सरकारी …
Read More »जागतिक रक्तदान दिनानिमित्त ‘इनरव्हील’तर्फे रॅली
बेळगाव : जागतिक रक्तदान दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव आणि बेळगाव येथील जैन हेरिटेज स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती. दावणगेरे येथील ब्लडमॅन शिवकुमार म्हादिमाने हे या रॅलीचे विशेष आकर्षण होते. धर्मवीर संभाजी चौकातून धर्म. संभाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पुढे किर्लोस्कर रोड, रामदेव …
Read More »बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची विशेष सभा
बेळगाव : दिनांक 14 जून 2024 रोजी बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदतर्फे आज चव्हाट गल्ली येथे बेळगाव कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. या सभेमध्ये बेळगावातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या विशेष सभेमध्ये सहभागी झाले होते. प्रमुख म्हणजे मराठा समाजाच्या शिक्षणासाठी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta