मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला विकास कामांचा आढावा बंगळूर : कर्नाटकातील सर्व मतदारसंघांसाठी लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आचारसंहिता लागू असल्याने त्याचा प्रशासकीय यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे. मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिली. विधानसौधच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या …
Read More »पुढील वर्षापासून दहावी परीक्षेतील ग्रेस मार्क्स रद्द
बंगळूर : पुढील वर्षापासून दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेत ग्रेस मार्क देण्याची पध्दत रद्द करण्याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विधानसौध येथे मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षी विद्यार्थ्यांना २० ग्रेस गुण दिले आहेत. कोणत्या कारणासाठी आणि हेतूने …
Read More »रोहित-नमनच्या अर्धशतकी खेळी व्यर्थ; मुंबईची हंगामअखेर पराभवानेच
मुंबई : आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनऊने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १९६ धावा करू शकला. मुंबईचा हा दहावा पराभव आहे. …
Read More »एपीएमसी पोलिसांकडून चोरट्याला अटक : दोन लाखाचे मंगळसूत्र जप्त
बेळगाव : महिलेला लुटणाऱ्या चोरट्याला एपीएमसी पोलिसांनी चोवीस तासांत अटक करून चोरीचे मंगळसूत्र जप्त केले. 16 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता एपीएमसी जवळ पायी चालत जाणाऱ्या प्रीती नार्वेकर नावाच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी एका व्यक्तीवर एपीएमसी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून एपीएमसी पोलिसांनी आरोपीचा …
Read More »कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत
कोल्हापूर : कागल तालुक्यातील आनूर – बस्तवडे बंधाऱ्यांमध्ये बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध सुरु आहे. जत्रेनिंमित्त हे सर्वजण जमले होते. या घटनेने कागल तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमध्ये जितेंद्र विलास लोकरे (३६, मुरगुड), त्याची बहीण रेश्मा दिलीप …
Read More »कर्नाटकात अभूतपूर्व भ्रष्टाचार; भाजपची टीका
राज्यात कायदा, सुव्यवस्था ढसळल्याचा आरोप बंगळूर : कर्नाटकमध्ये अभूतपूर्व पातळीवर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपने केला असून, विभागातील प्रत्येक पदासाठी रक्कम निश्चित केली आहे. पक्ष कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉ.सी.एन. अश्वत्थनारायण, विधान परिषद सदस्य चलवादी नारायण स्वामी, माजी आमदार पी. राजीव यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. …
Read More »महिलेचं डोकं अडकलं चक्क बसच्या खिडकीत!
बंगळुरू : बसच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचे डोके खिडकीत अडकून बसल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार आज बंगळुरूमध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बंगळूरमध्ये राज्य परिवहनच्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेने बसच्या लहान खिडकीतून खिडकीबाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या खिडकीतून बाहेर डोकावताना महिलेचं डोकं खिडकीत …
Read More »अंजली आंबिगेरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी : कोळी बेस्त समाजाचे आंदोलन
बेळगाव : हुबळीधील अंजली आंबिगेर नामक तरुणीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज बेळगावमधील जिल्हा कोळी बेस्त समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. बेळगाव जिल्हा कोळी बेस्त समाजाच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून आपला रोष व्यक्त केला. अंजलीच्या मारेकऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली …
Read More »पाक समर्थक हेरगिरी प्रकरण; एनआयएने फरार मुख्य आरोपीला केली अटक
बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हैदराबाद हेरगिरी प्रकरणी घोषित गुन्हेगार नूरुद्दीन उर्फ रफी याला अटक केली आहे. नुरुद्दीन जामिनावर बाहेर आला असून तो अनेक दिवस बेपत्ता होता. त्याला म्हैसूरच्या राजीव नगरमध्ये अटक करण्यात आली आहे. नुरुद्दीनवर ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी एनआयए अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव …
Read More »सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड; अश्लिल चाळे सुरु असल्याचा आरोप
सांगली : सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. कॅफे शॉपमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफे शॉपची तोडफोड करण्यात आली आहे. सांगली शहरातील विश्रामबाग 100 फुटी रोडवर हे कॅफे शॉप असून आत घुसून तोडफोड करण्यात आली. याशिवाय आणखी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta