गंगावती : हैदराबादहून बेळगावला जाणारी खासगी बस गंगावती तालुक्यातील हेमगुड्डा एचआरजी नगरजवळ उलटली, यात 10 प्रवासी गंभीर जखमी झाले. समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाला चुकवण्यासाठी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून 50 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण गंभीर जखमी झाले. 8 जणांवर गंगावती शासकीय रुग्णालयात …
Read More »राज्यातील वीज दरात कपात; वीज ग्राहकांना आनंदाची बातमी
बंगळूर : राज्यातील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिलेली असतानाच, पुन्हा वीजेचे दर कमी करून वीज ग्राहकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सरासरी १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर आकारण्यात येणारे विजेचे दर कमी करण्यात आले आहेत. अशा ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटवर एक रुपये १० पैशांची कपात …
Read More »झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, 12 जण गाडीखाली चिरडले
जामताडा : झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त झालेले सर्व प्रवासी अंग एक्सप्रेसने प्रवास करत होते. या दरम्यान कुणीतरी रेल्वे गाडीत …
Read More »पाण्याच्या टाकीत पडून बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : आपल्या आई सोबत टाकीतील पाणी भरण्यासाठी गेलेल्या बालिकेचा तोल जाऊन टाकीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी शिवाजी रोड कोनवाळ गल्ली येथे घडली. ओवी संतोष पवार (वय ३) असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. दुपारच्या वेळेत या बालिकेची आई पाणी भरण्यासाठी आपल्या सोबत या बालिकेला घेऊन गेली …
Read More »करवे कार्यकर्त्यांचा पुन्हा धिंगाणा; इंग्रजी बॅनर, नामफलक फाडले
बेळगाव : करवेने येनकेन प्रकारे बेळगाव शहरातील व्यापारी-व्यावसायिकांना वेठीस धरणे सुरूच ठेवले आहे. कन्नड नामफलकांसाठी करवे शिवरामगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला. बेळगावात व्यवसाय करणाऱ्या दुकानांच्या 60 टक्के नावाच्या पाट्या कन्नड भाषेत लिहाव्यात, यासाठी सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असली तरी ते लावले नसल्याच्या निषेधार्थ करवे शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी …
Read More »“संजीवनी वृद्धांना आधार”ची वर्षपूर्ती; गरजूंना दरमहा दिले जाते रेशन किट
बेळगाव : संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘वृद्धांना आधार’ या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून दरमहिना हे रेशन किट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम संजीवनीचे कर्मचारी करत असतात, वर्षपूर्ती निमित्त सर्वच जेष्ठांना फाउंडेशनमध्ये आमंत्रित करून रेशन किट सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी …
Read More »जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे 6 मार्चला भव्य कुस्ती मैदान
‘बेळगाव केसरी’ साठी पै. सिकंदर, पै. गुरुजीत एकमेकांना भिडणार बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या बुधवारी दि. 6 मार्च 2024 रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविले जाणार असून या मैदानात देशातील अव्वल पैलवानांसह इराणच्या पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधीर हणमंतराव बिर्जे यांनी दिली. हिंदवाडी …
Read More »मुलीनं पार पाडलं कर्तव्य; आईच्या पार्थिवाला मुलीकडून मुखाग्नी
खानापूर : मुलगा हा वंशाचा दिवा असतो. मृत्यूनंतर मुलाने मुखाग्नी दिली तरच मोक्ष प्राप्त होतो. अश्या बुरसटलेल्या विचारांना बगल देत आपल्या मृत आईवर मुलीने अंत्यसंस्कार केल्याची घटना खानापूर तालुक्यातील करंबळ येथे नुकतीच घडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मूळच्या करंबळ येथील व सध्या कारलगा येथील रहिवासी प्रभावती शंकर कवळेकर …
Read More »करंबळ, बेकवाड गावची महालक्ष्मी जत्रा मोठ्या उत्साहात
खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळसह होनकल, जळगे, रूमेवाडी, कौंदल महालक्ष्मी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.01 वाजता पाच गावचे ग्रामस्थ, नातेवाईक, तसेच खानापूर व तालुक्यातील भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपणाने महालक्ष्मी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी करंबळ, कौंदल, होनकल, जळगे, रूमेवाडी, खानापूर …
Read More »बिदर येथे पहाटे भीषण अपघात : चौघांचा जागीच मृत्यू
बिदर : बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील सेवानगर तांडाजवळ टाटा एस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दस्तगिर दावलसाब (३६), रशिदा सैक (४१), टाटा एस चालक वली (३१) आणि अमाम सैक (५१) अशी मृतांची नावे आहेत. उदगीरहून हैदराबादकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta