Friday , September 20 2024
Breaking News

मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण : जिल्हाधिकारी नितेश पाटील

Spread the love

 

बेळगाव : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (4 जून) रोजी होणार असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व तयारी करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयात बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. यासंबंधीची पूर्व तयारीची पाहणी केल्यानंतर रविवारी मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मतमोजणी सुरू होण्यापूर्वी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेली मतदान यंत्रे निवडणूक निरीक्षक, उमेदवार आणि निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडल्या जातील. सकाळी ८ वाजल्यापासून ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पोस्टल मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. तांत्रिक समस्या हाताळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 तंत्रज्ञांची नियुक्ती केली आहे.
आतापर्यंत पोस्टल बॅलेटला 11,148 मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत पोस्टल मतपत्रिका स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
मतमोजणीसाठी एकूण 552 पर्यवेक्षक/सूक्ष्म निरीक्षक आणि मतमोजणी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 लोक आणि तीन अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी केंद्रावर उपस्थित एजंट फॉर्म 7 मधील प्राधान्यक्रमानुसार बसतील.

मोबाईल, बिडी, सिगारेटवर बंदी

मतदान केंद्रावर मोबाईल फोन वापरण्यास बंदी असेल. याशिवाय त्यांना तंबाखू, बिडी, सिगारेट, पान आदी आणण्यास परवानगी दिली जाणार नाही.
मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली आहे आणि उमेदवार आणि एजंट यांच्या सोयीसाठी एक सशुल्क कॅन्टीन उघडण्यात येणार आहे.

संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री व वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. याशिवाय मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात सी.आर.पी.सी. कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आला असून या भागात कोणत्याही मिरवणुकीला किंवा विजयोत्सवाला परवानगी दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

यावेळी बोलताना बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन म्हणाले की, पाच केएसआरपीसह कडेकोट बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. शहरात 300 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून ड्रोनच्या माध्यमातूनही पाळत ठेवली जाणार आहे.
मतमोजणी केंद्रात दोन डीसीपींच्या नेतृत्वाखाली 13 पोलिस निरीक्षक काम करणार आहेत. सुरळीत वाहतूक आणि पार्किंगसह सर्व व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त याडा मार्टिन व इतर अधिकाऱ्यांनी मतमोजणी कक्ष, पार्किंग, सुरक्षा कर्मचारी तैनात, खानपान व्यवस्था, मीडिया सेंटर आदी सुविधांची पाहणी केली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिकेचे आयुक्त लोकेश पी.एन., अन्न विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरूनाथ कडबुर, तहसीलदार सिद्धराय भोसगी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार

Spread the love  बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *