कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. सिद्धरामय्या म्हणाले, “मी महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा माझं एका मुलीवर प्रेम होतं. मी मोठ्या हिंमतीने त्या मुलीसमोर माझ्या प्रेमाची कबुली दिली आणि तिला लग्नासाठी विचारलं. मात्र आमची जात वेगवेगळी असल्यामुळे ते नातं पुढे जाऊ शकलं नाही.” कर्नाटकचे …
Read More »राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; दहा जणांचा मृत्यू
राजकोट : गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तब्बल १० लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. ”आगीमागचं नेमकं कारण काय, याचा तपास सुरु असून शहरातील सगळे गेमिंग झोन बंद करण्याचे आदेश दिले आहेत” अशी माहिती पोलिस आयुक्तांनी …
Read More »उडपीत दोन गटात धुमश्चक्री: कारने तरुणाला चिरडले
उडपी : कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. उडपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेचा व्हिडीओ एका इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने शूट केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. तसेच, गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या तलवारी, …
Read More »गुगल मॅप्सच्या भरवशावर फिरायला निघाले, पण थेट कालव्यात जाऊन पडले
केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या असून यात ११ जणांचा बळी गेला आहे. अशातच केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण केरळ जिल्ह्यातील कुरुप्पनताराहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारी एक कार खोल कालव्यात कोसळली आहे. या कारमधून …
Read More »महावीर गोशाळेला चारा वाटप : फेसबुक फ्रेंड सर्कलचे कार्य
बेळगाव : फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे बेळगाव येथील महावीर गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आला. बेळगावातील महावीर गोशाळेत दीडशेहून अधिक गायी आहेत. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. याची गांभीर्याने दखल घेत फेसबुक मित्र मंडळाने 11 पोती चारा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी संतोष दरेकर, …
Read More »बेकवाड येथील व्यक्तीने केला पत्नीचा खून! वास्को गोवा येथील घटना
खानापूर : बेकवाड (ता. खानापूर) येथील पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करून खून केल्याची घटना वास्को-गोवा येथे शुक्रवारी दुपारी घडली. वैशाली चाळोबा केसरेकर (वय 39) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती चाळोबा गुणाजी केसरेकर (वय 45) याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, …
Read More »गोवावेसजवळ बंद पेट्रोलवरील शेडला अचानक आग
बेळगाव : बेळगाव शहरातील खानापूर रोड वरील गोवावेस जवळ असलेल्या दत्त मंदिरच्या बाजूला असणाऱ्या पेट्रोल पंपवर आज भीषण आग लागली होती. बंद असलेल्या पेट्रोल पंपवरील बाजूच्या शेडला ही आग लागली असून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या व त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी …
Read More »शरीरसौष्ठवपटू गजानन गावडे याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनने केला सत्कार
बेळगाव : उद्यमबाग येथील कारखान्यात काम करणाऱ्या गजानन गावडे या कामगाराने जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट शरीरयष्टीचे दर्शन घडवीत सुवर्णपदक पटकाविले. बिकट आर्थिक परिस्थिती असूनही त्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभाळत व्यायाम करून शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याने, त्याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनच्यावतीने सन्मान करण्यात आला. बेळगांव मायक्रो असोसिएशन उद्यमबागचे …
Read More »तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरूणाला अटक
बेळगाव : प्रेमप्रकरणातून किणये येथील तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरुणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजले. यासंदर्भात बोलताना पोलीस आयुक्त इडा मार्टिन म्हणाले की, किणये गाबतीलक एका तरुणीच्या घरावर दगडफेक करून त्रास देणाऱ्या तिप्पण्णा डुकरे याला किणये गावातून अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल …
Read More »माथेफिरू तरुणाचा प्रताप; प्रेयसीच्या घराच्या फोडल्या काचा!
बेळगाव : हुबळी येथील नेहा हिरेमठ आणि अंजली अंबिगेर यांच्या हत्याकांडाचे पडसाद अद्याप ताजे असतानाच बेळगावातील किणये गावात अशाच प्रकारचे प्रेमप्रकरण घडल्याचे समोर आले आहे. किणये गावातील तरुणाने आपल्या आवडत्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने आता पोलीस विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. किणये गावातील तिप्पण्णा डुकरे (२७) याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta