बेळगाव : उठसुठ मराठीद्वेषाची गरळ ओकणाऱ्या कानडी संघटनांनी आता राममंदिरासारख्या सर्व हिंदूंच्या श्रद्धा-जिव्हाळ्याच्या मुद्यालाही प्रसिद्धीसाठी लक्ष्य केले आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाने आज राममंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त फडकावलेल्या ध्वजांवर हिंदी मजकूर असल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. बेळगावातील चन्नम्मा चौकात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाने आज निदर्शने केली. सोमवारी अयोध्या राममंदिरात …
Read More »शुबमन गिल याच्यासह टीम इंडियाच्या चौघांना बेस्ट क्रिकेटर अवॉर्ड
हैदराबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 25 जानेवारीपासून कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेआधी मंगळवारी 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये 4 वर्षांनंतर बीसीसीआय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 4 वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आहे. बीसीसीआयचा हा पुरस्कार पॉली उमरीगर क्रिकेटर …
Read More »शिवसेनेच्या वतीने बेळगावात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती
बेळगाव : शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे आज मंगळवारी सकाळी शांताई वृद्धाश्रम, बामणवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सानिध्यात हिंदू हृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाला मिक्सर, ट्यूबलाइट्स आणि मिठाई भेटीदाखल देण्यात आली. सदर भेटीचा स्वीकार …
Read More »पंतप्रधान मोदींकडून गुजरात आणि देशात भिंत उभं करण्याचे काम; ठाकरेंचा वार
नाशिक : निवडणूक आल्याने पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मोदी देश आणि गुजरातमध्ये भिंत उभी करत आहेत, हे असलं हिंदुत्व मान्य नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »युवा समितीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
बेळगाव : सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने दिवंगत शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. टिळकवाडी येथील कावळे हॉस्टेल येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला …
Read More »टीजेएसबी बेळगाव शाखेत कारसेवकांचा हृद्य सत्कार
बेळगाव : अयोध्येत होणार्या श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून ठाणे जनता सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेत दि. 22 रोजी बेळगावातील काही कारसेवकांचा हृद्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कारसेवक सर्वश्री कृष्णानंद कामत, रमेश चिकोर्डे, गजेश नंदगडकर यांचा स्तकारमूर्तीत समावेश होता. क्लस्टर हेड प्रमोद देशपांडे यांनी स्वागत केले. ते …
Read More »कला गुणांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असते : वाय. पी. नाईक
बेळगाव : रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही कौतुकाची बाब आहे. यातून सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळते. महिला वर्ग अधिकाधिक सहभागी झालेल्या आहेत. अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने आत्मविश्वास निर्माण होतो. श्रीप्रभू रामाची हुबेहूब प्रतिकृती विविध रंगछटातून साकार करण्यासाठी कल्पकता वापरून चांगला प्रतिसाद मिळाला. हेच या स्पर्धेचे खरं यश आहे, असे …
Read More »‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेमध्ये श्रीराम प्रतिमा पुजन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील चिक्कोडी रोडवरील श्री.महात्मा बसवेश्वर क्रेडिट सोहार्द संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये श्रीराम प्रतिमापूजन करण्यात आले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व सिध्देश्वर स्वामीजींची प्रतिमा पूजन संचालकांच्या हस्ते झाले. संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी म्हणाले, संस्थेमध्ये व सर्व शाखेमध्ये रामराज्याप्रमाणे कार्य व्हावे. ज्यामुळे सर्व ग्राहकांना त्यांचा फायदा होऊन त्यांच्या …
Read More »हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
बेळगाव : आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय रामलिंगखिंड गल्ली येथे हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आज बाळासाहेबांचा जन्मदिवस योगायोगानं काल अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि बाळासाहेबांचा एक संकल्प पूर्ण झाला, पण त्याचं बेळगांव सह संयुक्त महाराष्ट्राच …
Read More »‘ईव्हीएम’ हटाओसाठी निपाणीत २५ ला मोर्चा
निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षापासून निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर केला जात आहे. त्यामध्ये घोटाळा असून येथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरू नयेत. यासाठी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ संविधान बचाओ, लोकतंत्र बचाओ, मोर्चा गुरुवारी (ता.२५) येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta