Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

उचगाव मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम 8 जानेवारी रोजी

  उचगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या 22 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाची मुहूर्तमेढ कार्यक्रम सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता या भागातील जागृत असे मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्योदय …

Read More »

ननदीवाडी येथे अठरा गुंठ्यात दहा टन वांग्याचे विक्रमी उत्पादन

  चिकोडी : चिकोडी तालुक्यातील ननदीवाडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री सदाशिव श्रीपती वंजीरे व ओंकार वंजीरे यांनी आपल्या 18 गुंठे जमिनीमध्ये सहा महिन्यात तब्बल 10 टन इतके वांग्याचे विक्रमी उत्पादन घेतले. यावेळी बोलताना सदाशिव वंजीरे म्हणाले, वांग्याच्या झाडाची उंची सरासरी सहा ते सात फूट इतकी आहे. सध्या वांग्याच्या बागेमध्ये अजून …

Read More »

हॉकी बेळगावतर्फे 8 जानेवारीपासून भव्य हॉकी स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : हॉकी इंडिया आणि हॉकी कर्नाटकशी संलग्न असलेल्या हॉकी बेळगाव संघटनेतर्फे येत्या सोमवार दि. 8 ते शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 या कालावधीत मुला -मुलींच्या भव्य आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस (लेले) मैदानावर ही स्पर्धा साखळी …

Read More »

राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने निपाणीतील पत्रकार राजेंद्र हजारे सन्मानित

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची ‘आढावा महाराष्ट्राचा’ गौरव महाराष्ट्राचा तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली होती. बुधवारी (ता.३) कोल्हापूर दसरा चौकातील शाहू स्मारकमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना कोल्हापूरच्या आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर जिल्हा गृह उपाधिक्षिका प्रिया पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. …

Read More »

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार हे हिंदुत्व विरोधी : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार हे हिंदुत्व विरोधी आहे. अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापनेचे काम जोरदार होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अकारण जुने खटले उकरून काढून गुन्हे दाखल करण्याचे काम काँग्रेस सरकारने सुरू केले आहे. हे अत्यंत दुर्दैवी क अन्यायकारक आहे, असा आरोप भाजप बेळगाव जिल्हा महिला ग्रामीण विभागाच्या अध्यक्षा …

Read More »

मुलांनी फुले तोडली म्हणून अंगणवाडी मदतनीसाचे नाक कापले

  बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मतदारसंघातच महिला सुरक्षित नसल्याचा प्रत्यय देणारी घटना घडली आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटना एकापाठोपाठ एक उघडकीस येत आहेत. वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. ती विस्मरणात जाते न जाते तोच अंगणवाडी मदतनीस महिलेचे नाक कापून …

Read More »

हुबळीतील हिंदु कार्यकर्त्यांच्या अटकेवरून भाजप-कॉंग्रेसमध्ये वाद

  काँग्रेसकडून अटकेचे समर्थन; निषेधार्थ भाजपचे आज राज्यव्यापी आंदोलन बंगळूर : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ३१ वर्षांपूर्वी झालेल्या संघर्षात कारसेवेत सहभागी झालेल्या दोन हिंदू कार्यकर्त्यांच्या अटकेमुळे राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. राज्य सरकारने अटकेचा बचाव केला आहे, तर भाजपने या अटकेचा निषेध केला आहे. हिंदू कार्यकर्त्यांच्या अटकेवरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवारी

  बेळगाव : १७ जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक गुरुवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी व कार्याध्यक्ष मनोहर किणेकर …

Read More »

“अयोध्येत राम मंदिराच्या जागी आधी गौतम बुद्धांचं मंदिर होतं, उत्खनन केलं तर…”; रामदास आठवलेंचा दावा

  नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर बांधून झालं आहे. त्या ठिकाणी आता रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पूजा केली जाणार आहे. देशभरात या मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह आहे. तसंच राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरात विविध पद्धतीने तयारीही सुरु आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच …

Read More »

शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अभाविपचा रास्ता रोको

  बेळगाव : चेक बाऊन्स फसवणूक प्रकरणात दोषी ठरलेले शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारावी, या मागणीसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव यांच्या वतीने आरपीडी सर्कलमध्ये रास्ता रोको करण्यात आला. यावेळी अभाविप कार्यकर्ते रोहित यांनी सांगितले की, शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्या विरोधात चेक बाऊन्स प्रकरणी …

Read More »