
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ, संचलित बिजगर्णी हायस्कूलला रोटरी क्लब ऑफ दक्षिण बेळगाव या सेवाभावी संस्थेतर्फे पंचवीस बेंच भेट देण्यात आले. त्यानिमित्ताने प्रशालेत बेंच सूपूर्द सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्था अध्यक्ष एस. आर. मोरे उपस्थित होते
विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन वर्षभरातील राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी भौतिक सुविधा आवश्यक आहेत. या शाळेला सुसज्ज मैदानआहे इमारत तसेच वर्ग खोल्या, तज्ज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. महत्वाचे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुंदर बेंच ची आवश्यकता होती. त्याची परिपूर्ती रोटरी क्लब च्या माध्यमातून केल्याने समाधान व्यक्त केले.
यावेळी रोटरीचे गव्हर्नर अशोक नाईक, रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. गोविंद मिसाळे, सचिव प्रा. प्रणव पित्रे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव, अशोक नाईक, गोविंद मिसाळे, प्रणव पित्रे यांनी मनोगत व्यक्त करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं, कष्टकरी शेतकरी कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी भविष्यातही या शाळेसाठी सहकार्य करु . समाजातील वंचित घटकांना मदत करणं हा एकमेव हेतू आहे.समाजाचं आपण देणं लागतो, असे भावनिक विचार यावेळी व्यक्त केले गेले. व्यासपीठावर एस आर मोरे, एस एम जाधव, ए एल निलजकर, अशोक नाईक, डॉ गोविंद मिसाळे, रोटरीचे सचिव प्रा. प्रणव पित्रे, यल्लापा बेळगावकर, ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, पुंडलिक जाधव, अशोक कांबळे, सदस्या मलप्रभा जाधव, उपस्थित होते
या सोहळ्याला मनोहर पाटील, माजी मुख्याध्यापक वाय.एच. पाटील, यशवंतराव मोरे, एम.पी मोरे, बंडू भास्कर, मारुती जाधव,सागर, नाईक, प्रकाश भास्कर, कल्लापा अष्टेकर, सातेरी जाधव, शिक्षक वर्ग, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन आर एम कांबळे, प्रास्ताविक वाय पी नाईक व आभार के.आर. भाष्कळ यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta