Monday , June 1 2026
Breaking News

बॉक्स हापूसचा, आंबे मात्र कर्नाटकी

Spread the love

 

निपाणी बाजारपेठेत सर्रास विक्री ; ग्राहकांचे होतेय फसवणूक

निपाणी (वार्ता) :;जी.आय २९ मानांकन मिळालेला व जगभर प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचा हंगामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. तरीही निपाणी बाजारपेठेत कर्नाटकातून आलेल्या आंब्यांची हापूस म्हणून विक्री सुरू झाल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. बॉक्स हापूसचा असला तरी त्यामध्ये आंबे मात्र कर्नाटकातील आहेत.शिवाय त्याचे दरही ७०० ते ८०० आहेत.
येथील बाजारपेठेत दिशाभूल करून ज्यादा दराने आंब्यांची विक्री होत आहे. या प्रकारावर कारवाईची मागणी करण्याची मागणी होतआहे.
कोकणातील विशेषतः रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरातील हापूस आंब्याची किरकोळ अवक सुरू झाली आहे येथील बाजारात पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने दरही अवाक्याबाहेर आहेत.याचा फायदा उचलण्यासाठी काही विक्रेते कर्नाटकातून आंबा आणून येथील स्थानिक बाजारात हापूस आंब्याच्या नावाखाली शहरातील विविध रस्त्यासह महामार्गावर विक्री करत आहेत. याशिवाय कच्च्या आंब्यावर रासायनिक प्रक्रिया करूनही विक्री केली जात आहे. त्याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
—————————————————————–
‘कोकणच्या हापूस आंब्याला जी. आय मानांकन मिळाल्यानंतर मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरत पुरवठा करणाऱ्या वाहतूकदरांची साखळी निर्माण होत असून कर्नाटकातील वाहतूकदार, व्यापाऱ्यांनी प्रवेश केला आहे. अशा व्यापाऱ्यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.’
-प्रभाकर पाटील, ग्राहक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *