
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामध्ये चैत्र मासा निमित्त सर्व देवांना देव बोलवायचा कार्यक्रम राजवाड्यामध्ये पार पडला.
प्रारंभी निपाणकर राजवाड्यामध्ये मानकरी एकत्र येऊन सवाद्य मिरवणुकीने रेणुका मंदिर जत्राट वेस येथे पोहोचले. तिथून जग ज्योतिबाची सासनकाठी सासणे गल्लीतील श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर महादेवाची काठी, पालखी व श्रीशैल ला गेलेल्या कावडची शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढून निपाणकर राजवाड्यामध्ये आणण्यात आली. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजाअर्चा झाली. त्यानंतर मानकर-यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी रेणुका मातेचा जग रवाना करून रात्री उशिरा जोतिबाची जोतिबाचा चौक मांडून या कार्यक्रमाची गोंधळ घालून सांगता करण्यात आली.
कार्यक्रमास श्रीमंत राजमाता राजलक्ष्मीराजे, श्रीमंत सुकीर्तीराजे, श्रीमंत राजेश्वरीराजे, श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे, राजकुमारी ऋतंबराराजे, श्रीमंत विजयराजे, श्रीमंत राजेशराजे, युवराज श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर, विश्वासराव पाटील, बाळासाहेब पवार, मोहन कमते, सागर कमते, धर्मराज कमते, गजानन वसेदार, विजय सासणे, जयवंत सासणे यांच्यासह मानकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta