Monday , September 21 2026
Breaking News

श्रीमद जगदगुरु शंकराचार्य जयंती उत्सव १८ ते २१ एप्रिल

Spread the love

 

बेळगाव : श्रीमद जगदगुरु शंकराचार्य जयंती उत्सवाचे शनिवार दि. १८ ते मंगळवार दि. २१ या कालावधीत चिदंबर नगर येथील श्री चिदंबरेश्वर मंदिरात आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ ते २१ पर्यंत दररोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत श्री रुद्राभिषेक, महापूजा, आरती होणार आहे. सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत विविध महिला मंडळे स्तोत्र आणि भजन सेवा करणार आहेत.सायंकाळी साडे सहा ते साडे सात या वेळेत श्री स्वप्रकाशानंद स्वामीजी यांचे आणि श्री चिदंबर मुनवळ्ळी यांचे श्री शंकर तत्वज्ञानावर आधारित प्रवचन होणार आहे.
रविवार दि. १९ रोजी सायंकाळी चार वाजता श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कृत स्तोत्र पठण (वाचन ) स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. कोणतेही एक स्तोत्र वाचून म्हणून दाखवायचे आहे.
जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक सेवाही मंदिरात आयोजित करण्यात आल्या आहेत. सेवा करू इच्छिणाऱ्या भक्तांनी मंदिरात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी प्रा. संजीव कुलकर्णी मोबाईल क्र.m ९४४९५२९३९३ यांच्याशी संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *