Sunday , July 26 2026
Breaking News

श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सजीव देखावा स्पर्धा २०२६ जाहीर

Spread the love

 

बेळगाव : शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला यंदाही भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. सार्वजनिक शिवजयंतीची परंपरा शंभरी ओलांडून आज अलोट गर्दीत साजरी होत असून शहर परिसरातील अनेक मंडळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करतात. विशेष म्हणजे या उपक्रमात महिला व बालचमूंचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो.

या पार्श्वभूमीवर मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. रवी पाटील पुरस्कृत श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे “सजीव देखावा स्पर्धा २०२६” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील चित्ररथांचे परीक्षण पारंपरिक मार्गावर फिरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी ₹३१,०००, द्वितीय ₹२५,०००, तृतीय ₹२१,०००, चतुर्थ ₹१५,०००, पाचवा ₹१३,०००, सहावा ₹११,०००, सातवा ₹९,०००, आठवा ₹८,०००, नववा ₹७,००० व दहावा क्रमांकासाठी ₹५,००० असे बक्षिसांचे स्वरूप आहे.

तसेच वैयक्तिक गटात उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराज अभिनय, उत्कृष्ट राजमाता जिजाऊ साहेब अभिनय, आकर्षक महिला व पुरुष अभिनय तसेच उत्कृष्ट बालकलाकार अशा विशेष पारितोषिकांचाही समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क ₹१०० निश्चित करण्यात आले असून नोंदणीची अंतिम तारीख १८ एप्रिल आहे. इच्छुकांनी ग्रीन्स द युनिक पान शॉप, केळकर बाग, दत्त मंदिरासमोर, बेळगाव येथे नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी सुनील जाधव (९९६४३७०२६१), मेघन तारीहाळकर (७३५३२५३५७३) व प्रसाद पाटील (८०५०००९६६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवजयंती उत्सव अधिक भव्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *