Saturday , November 7 2026
Breaking News

युवकांसाठी डॉ. आंबेडकरांचे विचार महत्त्वपूर्ण

Spread the love

 

सहकारत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये महामानवाला अभिवादन

बोरगाव (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश सर्वांना दिला आहे. तो सध्याच्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरत आहे. डॉ. अबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व आजच्या युवा पिढीसाठी आवश्यक असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.बोरगांव येथील पी.के.पी.एस. येथे डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंती पार पडली. त्यावेळी ते बोलत होते
उत्तम पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. युवा ज्ञउद्योजक अभिनंदन पाटील यांनी, तंत्रज्ञानाच्या युगात योग्य दिशेने वाटचाल करताना डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आधार घेतल्यास समाज अधिक सक्षम होऊ शकत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, सीईओ अशोक बंकापुरे, कृषी संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, सी.इ.ओ. आर. टी. चौगुले, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, प्रवीण पाटील, राजेंद्र एदमाळे, दर्शन पाटील, सुरेश बंकापुरे, राजू गजरे, सहाय्यक कार्यनिर्वाहक राकेश फिरगन्नवर, शीतल हवले, मायागोंडा पाटील अजित सवाडे उपस्थित होते. नगर पंचायत कार्यालयात नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

जेलभरो आंदोलनासाठी जाणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना निपाणी पोलिसांनी रोखले

Spread the love    निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ऊसासह अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *