Sunday , September 20 2026
Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांती स्तंभास मानवंदना

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कॅप्टन मनोहर गायकवाड यांनी क्रांती स्तंभाला मानवंदना दिली. ३ डिसेंबर १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची म्युन्सिपल हायस्कूल येथील सभेमध्ये दलित शोषीत वंचित बहुजनांना शासनकर्ती जमा झाली पाहिजे असा क्रांतिकारी संदेश दिला. या संदेशाची आठवण राहावी म्हणून क्रांतीस्तंभाची उभारणी केल्याचे सुधाकर माने यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणाहून हा संदेश गावोगावी पोहोचावा म्हणून क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. भीम मंडळातर्फे विविध ठिकाणाहून क्रांती स्तंभाजवळ ज्योत आणली होती.
क्रांतीसंभाचे संकल्पक सुधाकर माने व संतोष मेस्त्री यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. क्रांती स्तंभाजवळ ४८ भीम मंडळांनी क्रांतीज्योत प्रज्वलित केली. यावेळी प्रा. जे. डी. कांबळे, गणू गोसावी, विठ्ठल वाघमोडे, जयसिंग कांबळे, बाबुराव माने, गौतम कांबळे, प्रवीण कांबळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ठळोबा पेठेतील प्रबुद्ध ग्रुप आणि क्रांतीस्तंभ संवर्धन समितीने परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *