
बेळगाव : महाविद्यालयात मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांशी उद्धट वर्तन करणार्या प्राध्यापकाची धुलाई केली आहे. हा प्रकार बेळगावमधील सरदार महाविद्यालयात घडली आहे.
बेळगावमधील सरदार पीयूसी महाविद्यालयात झालेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्या प्राध्यापकाचे नाव बसवमुर्ती असे आहे. दररोज मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांना त्रास देत, त्यांच्याशी अर्वाच्च शब्दात संभाषण करणे, हातवारे करणे असे प्रकार बसवमुर्ती करत होता. आजदेखील असाच प्रकार घडून आल्याने संतापलेल्या अतिथी प्राध्यापिकांनी सदर प्राध्यापकाची यथेच्छ धुलाई केली आहे.
यासंदर्भात महाविद्यालयाच्या इतिहासाच्या प्राध्यापिका श्वेता यांनी माहिती देताना सांगितले की, बसवमुर्ती हे दररोज मद्यपान करून महाविद्यालयात येतात. नेहमीप्रमाणे आजदेखील त्यांनी मद्यपान करून अर्वाच्च शब्दात बोलण्यास सुरुवात केली. स्टाफ रूममध्ये येऊन अर्वाच्च शब्द वापरून आपल्यावर हात उचलला असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात आपल्याला संबंधित अधिकार्यांनी न्याय द्यावा, दररोज मद्यपान करून येणार्या या प्राध्यापकांना योग्य धडा शिकवावा, अतिथी प्राध्यापिका याही सर्वसामान्य मनुष्याप्रमाणेच आहेत. आपल्याप्रमाणेच कार्य करतात. कामाच्या ठिकाणी आपल्याला सुरक्षितता मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
यावेळी महिला पोलीस स्थानकाच्या महिला कर्मचारी दाखल झाल्या. दरम्यान अतिथी प्राध्यापिकांनी अमित बसवमुर्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta