Friday , August 21 2026
Breaking News

न्यू गुड्सशेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य जलनिस्सारण गटारे बांधावीत, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एल अँड टी कंपनीने केलेल्या कामानंतर गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून दरवर्षी पावसाळ्यात केवळ तात्पुरत्या स्वरूपात खडीची धूळ अथवा मुरूम टाकून डागडुजी केली जाते. मात्र वर्षभर रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खराब रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दुचाकीस्वार किरकोळ अपघातांना बळी पडत असून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच या मार्गाने ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेल्या चिखलयुक्त पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश खराब होत आहेत.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी, धूळ प्रदूषण आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलावरून वाहून येणारे पावसाचे पाणी दिवसभर रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची अधिक हानी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीबरोबरच दोन्ही बाजूंना सक्षम जलनिस्सारण व्यवस्था व गटारे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्याची सुरुवात झाल्याने पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण करावे, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने या गंभीर सार्वजनिक समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, रुग्ण व दैनंदिन प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

शारदा विद्यालयात मोफत नेत्रतपासणी शिबिर

Spread the love    बेळगाव : शहापूर येथील शारदा विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत बुधवार, दि. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *