


बेळगाव : सामाजिक बांधिलकी जपत अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने नेपाळसाठी २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षा राजश्री हसबे यांनी ही मदत अलायन्सच्या आंतरराष्ट्रीय सदस्या डॉ. नवीना शेट्टीगार यांच्याकडे सुपूर्द केली.
या मदतकार्यासाठी संजिविनी फाउंडेशनच्या डॉ. सविता देगीनाळ आणि शरद पाटील यांनी विशेष सहकार्य केले. गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने क्लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
मानवतेच्या भावनेतून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्यासाठी अलायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलने आवाहन केल्यानंतर अलायन्स वेणुग्रामने प्रतिसाद देत मदत केल्याबद्दल नवीना शेट्टीगार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी सचिव पुरुषोत्तम हसबे, खजिनदार जीवन कदम, नीलम कदम, राम गुरव, मधुरा गुरव, ज्योती गवी, दीपाली देसाई, रेखा बामणे आणि मनोहर कालकुंद्रीकर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta