Friday , October 23 2026
Breaking News

तारांगण व ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

Spread the love

 

 

बेळगाव : साहित्यिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या तारांगण व ज्येष्ठ नागरिक संघटना बेळगाव यांच्या वतीने उद्या दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी चार वाजता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे हे शिबिर ज्येष्ठ नागरिक संघटना कार्यालय डॉक्टर नीता देशपांडे डायबिटीस सेंटर सोमवार पेठ टिळकवाडी या ठिकाणी आयोजित केले आहे. त्या शिबिरामध्ये मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी व नेत्र तपासणी होणार आहे तसेच आरोग्याबाबत सल्ला तज्ञ डॉक्टर सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. सेंट्रल केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल टिळकवाडी आणि एम एम जोशी कोडकिणी आय सेंटर हे हॉस्पिटल यामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी सहभागी होणार आहेत. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *