


येळ्ळूर : कर्नाटक सरकारने तालुका पंचायत, जिल्हा पंचायत विकास ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. या निवडणुका मराठी भाषिकांचा लढ्याचा भाग म्हणून लोकेच्छा दाखविण्यासाठी पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार नेताजी सांस्कृतिक भवन येथे संपन्न झालेल्या येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वामनराव पाटील होते.
बैठकीच्या सुरवातीला ज्येष्ठ अभिनेते कै. नाना पाटेकर, अशोक बस्तवाडकर, कै. प्रेमा सिद्दोजी मुरकुटे, कै. विनायक उघाडे, कै. शालन प्रकाश सायनेकर, कै. रवि तुळजाई, कै. चांगाप्पा सायनेकर, कै. सिद्दापा दणकारे, कै. यल्लापा भुजंग चिट्टी यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

सेक्रटरी प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाच्या दाव्याला न्यायालयात बळकटी मिळण्यासाठी येत्या निवडणुका प्रचंड मताधिक्याने जिंकणे महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
युवानेते दत्ता उघाडे यांनी निवडणूक लढविण्यासाठी सर्वांची संमती हवी असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले.
अनिल हुंदरे यांनी जबाबदारीने काम केल्यास यश निश्चित असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहन केले. 13 वार्डात टप्याटप्याने बैठकीचे सत्र सुरू करून वार्डवाइज कमिट्या कराव्यात, असे कार्याध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी सांगितले. उदय जाधव यांनी कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक निर्माण करून एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या सोपवाव्यात, असे आवाहन केले. तरूणानी कोणत्याही अमिषाला न भूलता समिती कार्यात झोकून द्यावे, असे पत्रकार बी. एन. मजुकर यांनी सांगितले. मारूती तुळजाई यांनी अवचारहट्टी येळ्ळूर म.ए. समितीच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले. नागेश बोबाटे यांनी आपापल्या वार्डातील लोकांच्या गाठीभेटी घेऊन वरीष्ठांच्या सल्याने कार्य करण्याचे नमूद केले.
याप्रसंगी आपाजी कुगजी, अनिल ग. पाटील, शिवाजी ह. पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीत बेळगाव महापालिकेत झालेल्या महाजन अहवालाच्या ठरावाला तीव्र विरोध केल्याबद्दल रवि साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे या नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले. तर ठरावाला संमती देणाऱ्या मराठी भाषिकांवर निवडणूक आलेल्या नगरसेवकांचा निषेध करण्यात आला.
त्याचबरोबर 1 नोव्हेंबर काळ्यादिनासंर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी
चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. आणि राधानगरी-कोल्हापूरचे तरूण विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी पुणे येथे एम पी एस सी आंदोलनात सीमाप्रश्नाचा विशेष उल्लेख करून मराठी भाषिकांच्या व्यथा मांडल्याबद्दल त्याचही अभिनंदन करण्यात आले.
या बैठकीस चांगदेव परीट, यलुप्पा पाटील, नेताजी गोरल, सतिश परशराम धामणेकर, रमेश ज. धामणेकर, सुरज गोरल, गोविंद बापूसाहेब पाटील रमेश पाटील, दौलत पाटील, सतीश देसूरकर, रमेश मो. धामणेकर, लक्ष्मण कुंडेकर, प्रकाश मालुचे, सचिन कुंडेकर, बाळकृष्ण धामणेकर, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, आनंदा कंग्राळकर, बाळासाहेब पावले, सतिश शि. पाटील, सदाशिव पाटील, राजू धामणेकर, भीमराव पुण्याणावर, कृष्णा बिजगरकर, कृष्णा शहापूरकर, दयानंद उघाडे, राकेश परीट, रामभाऊ पाखरे, बाळकृष्ण पाटील, संजय हुंदरे, पप्पू कुंडेकर, विनोद पाटील, सुरज पावले, विलास पाटील, धाकलू करविनकोप, चांगाप्पा धामणेकर, नाथाजी कदम, परशराम धामणेकर, हणमंत पाटील, दीपक कुगजी, आकाश कुगजी, सातेरी गोरल आदी बहुसंख्य उपस्थित होते.
उपाध्यक्ष राजू पावले यांच्या आभारप्रदर्शनानंतर बैठकीची सांगता झाली. बैठकीला युवकांची संख्या लक्षणीय होती.

Belgaum Varta Belgaum Varta