Friday , October 23 2026
Breaking News

निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या चौकशीसाठी समिती नेमा; राष्ट्रपतींकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मागणी

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्या बेळगाव शाखेच्या वतीने भारताच्या राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावरील विविध आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली.

गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर केलेल्या या निवेदनात देशातील निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांची रीतसर चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेत मतदार यादीमध्ये करण्यात आलेले कथित अनावश्यक फेरबदल, ईव्हीएम (EVM) मशीनबाबत उपस्थित झालेले आरोप तसेच फॉर्म क्रमांक ६ मध्ये करण्यात आलेले कथित बदल या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे नमूद केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) बेळगाव शाखेचे सरचिटणीस महांतेश कोळुचे, प्रदीप देसाई, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. अश्वजीत चौधरी, ॲड. हरिबासू धुळाजी, ॲड. राधेश शहापूरकर, प्रभाकर अकनोजी, विलास नंदी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *