


लिंगराज एन.; बागेवाडी महाविद्यालयात राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमा बरोबरच क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या क्षेत्रापासून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. कोणताही खेळ मनापासून खेळल्यास यश निश्चित मिळते. त्यासाठी दररोजचा सराव महत्त्वाचा आहे. सदृढ आरोग्य आणि मनासाठी खेळ आवश्यक आहेत, असे मत चिक्कोडी जिल्हा शैक्षणिक विभागाचे उपनिर्देशक लिंगराज एन. यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या राज्यस्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ‘लॉन टेनिस स्पर्धेचे’ गुरुवारी (ता.१५) के.एल.ई. संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महा विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पदवीपूर्व शालेय शिक्षण विभाग, चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा उपसंचालक शालेय शिक्षण विभाग पदवीपूर्व महाविद्यालयीन प्राचार्य आणि व्याख्याता संघ, कर्मचारी संघ आणि शारीरिक शिक्षण व्याख्याता संघ, शैक्षणिक जिल्हा चिक्कोडी आणि के.एल.ई. संस्थेच्या जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून त्यानंतर टेनिस टेबल कोर्टाचे उद्घाटन करण्यात आले.
पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्य एच. डी. चिकमठ यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. सिद्धू उदगट्टी यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा देवविली. जगदीश सुरन्नावर, ॲड. रणजीत संग्रोळी, मधुसूदन बिळगी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांचे १४ तर विद्यार्थिनींचे ११ संघ सहभागी झाले आहेत. एकूण २५० पेक्षा अधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
यावेळी स्थानिक मंडळाचे संचालक महेश बागेवाडी, डॉ. एस. आर. पाटील, एम.आर. पाटील, गोपाल कृष्णन, एस. एस. सनदी, जगदीश सुरण्णावर, विठ्ठल बढाई यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, खेळाडू उपस्थित होते. जी. एम. चनगौडा यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta