Friday , October 23 2026
Breaking News

मराठा बँकेच्या चेअरमनपदी विश्वनाथ (शेखर) हंडे, तर व्हा. चेअरमनपदी विनोद हंगिरकर यांची बिनविरोध निवड

Spread the love

 

बेळगाव : मराठा बँकेच्या चेअरमनपदी श्री. विश्वनाथ (शेखर) हंडे, तर व्हाईस चेअरमनपदी श्री. विनोद सदाशिवराव हंगिरकर यांची बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली. या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे माजी चेअरमन श्री. बाळाराम बाबुराव पाटील होते.

सभेच्या प्रारंभी बँकेचे जनरल मॅनेजर श्री. संतोष धामणेकर यांनी चेअरमनपदासाठी विश्वनाथ (शेखर) हंडे आणि व्हाईस चेअरमनपदासाठी विनोद हंगिरकर यांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती दिली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने माजी चेअरमन बाळाराम बाबुराव पाटील यांनी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

निवडीनंतर नूतन चेअरमन विश्वनाथ (शेखर) हंडे आणि व्हाईस चेअरमन विनोद हंगिरकर यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी BOM चेअरमन श्री. बाळासाहेब काकतकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मराठा बँकेला गौरवशाली परंपरा लाभली आहे. कै. शामराव देसाई, कै. शिवाजीराव काकतकर, कै. अर्जुनराव घोरपडे, कै. बाबुराव हंडे, कै. सदाशिवराव हंगिरकर, कै. अर्जुनराव हिशोबकर आणि कै. दीपक दळवी यांसारख्या ज्येष्ठ समाजधुरिणांच्या अथक परिश्रमातून बँकेची उभारणी झाली. त्यांनी घालून दिलेल्या तत्त्वांनुसार सहकाराच्या माध्यमातून बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ही परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टीने नव्या पदाधिकाऱ्यांची निवड महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी चेअरमन श्री. दिगंबर पवार, श्री. एल. एस. होनगेकर, सौ. रेणू किल्लेकर, सौ. दीपाली दळवी, श्री. मोहन चौगुले, श्री. मोहन बेळगुंदकर, श्री. विनायक होनगेकर, श्री. विश्वजीत हसबे, श्री. प्रशांत चिगरे, श्री. अशोक कांबळे, सीए शिवकुमार शहापूरकर आणि अॅड. जयराज मोदगेकर यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

नूतन चेअरमन विश्वनाथ (शेखर) हंडे आणि व्हाईस चेअरमन विनोद हंगिरकर यांनी सर्वांचे आभार मानले. मराठा बँक ही बहुजन समाजाचा मानबिंदू असून बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकात बँकेने लौकिक मिळविला आहे. भविष्यातही बँकेची प्रगती आणि यशस्वी वाटचाल कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बँकेचे सर्व संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते. शेवटी जनरल मॅनेजर श्री. संतोष धामणेकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *