Friday , October 23 2026
Breaking News

शहापुरात वेंकट रमण देवस्थानांचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात

Spread the love

 

बेळगाव : विजयादशमीच्या मंगलमय पर्वानिमित्त बेळगाव शहर आणि शहापूर येथे वेंकट रमण देवस्थानांचा पारंपरिक रथोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. दोनशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या या रथोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्री वेंकट रमणाचे दर्शन घेतले.

रथोत्सवानिमित्त शहरातील आणि शहापूर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांनी ‘वेंकट रमण गोविंदा, गोविंदा’ असा जयघोष करत रथ ओढला. रथाच्या मार्गावर ठिकठिकाणी सडे घालून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिलांच्या टिपरी पथकानेही रथोत्सवात सहभाग घेत पारंपरिक उत्साहाची भर घातली.

पुष्पवृष्टी आणि आरती 

रथोत्सव मार्गावर भाविकांकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. ठिकठिकाणी सुहासिनींनी रथाची आरती करून श्री वेंकट रमणाप्रती श्रद्धा व्यक्त केली. तसेच भाविकांसाठी विविध ठिकाणी प्रसादाचे वितरण करण्यात आले.

शहरातील प्रमुख मार्गांवरून वाजतगाजत रथाची मिरवणूक काढण्यात आली. भक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक धार्मिक विधी आणि उत्साही वातावरणात रथ मंदिरात परतल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली.

दोनशे वर्षांहून अधिक काळ जपली गेलेली ही परंपरा आजही भक्तिभावाने सुरू असून, बेळगावच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन या रथोत्सवातून घडले.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *